मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गुवाहाटीला जाण्याचे नेमकं कारण; वाचा सविस्तर

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गुवाहाटीला जाण्याचे नेमकं    कारण; वाचा सविस्तर

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आपल्या समर्थक आमदार आणि खासदारांसह (MLA and MP) आज कामाख्या देवीचे (Kamakhya Devi) दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीकडे रवाना झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला...

यावेळी ते म्हणाले की, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिले होते. आम्ही गुवाहाटीवरून (Guwahati) घाई गडबडीत आलो होतो. त्यामुळे आता आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणानुसार जात आहे. श्रद्धेने जात आहे. त्यात कुणाला काही वाटण्याची आवश्यकता आहे, असे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, राज्यातल्या जनतेसाठीच आम्ही गुवाहाटीला जात असून बाकी आमचा दुसरा कोणताही अजेंडा नाही. तसेच कामाख्या देवीने आमची इच्छा पूर्ण केली. महाराष्ट्रातील (Maharashtra) जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले. त्यामुळे देवीकडे आणखी काही मागण्याची गरज नाही. आम्ही भक्तीभावाने जात आहोत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, एका विशेष विमानाने आमदार आणि खासदार गुवाहाटीकडे मार्गस्थ झाले आहेत. एकूण १८० जण या विमानात (Plane) असून आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोहचतील. त्यानंतर दुपारी ते कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com