Friday, May 10, 2024
Homeमुख्य बातम्यागुजरात निवडणूक निकालावर मुख्यमंत्र्यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया, म्हणाले...

गुजरात निवडणूक निकालावर मुख्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | Mumbai

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा (BJP) काँग्रेस (Congress) आणि आप (AAP) अशी तिरंगी लढत झाली. मात्र, याठिकाणी भाजपाला मोठे यश मिळताना दिसत आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनीही गुजरात निकालावर प्रतिक्रिया दिली आहे…

- Advertisement -

ते म्हणाले की, मी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Assembly Elections) निकालासाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह आणि गुजरातच्या नागरिकांचे अभिनंदन करतो. एक चांगला निकाल आला आहे. भाजपाला गुजरातमध्ये १५० पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि त्यांची टीमही गुजरातमध्ये प्रचारासाठी गेली होती. त्यांचेही मी मनापासून अभिनंदन करत सर्वांना शुभेच्छा देतो, असे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, मोदींची जादू देशात आणि विदेशात सगळीकडे आहे. आज आपल्याला जी-२० चं अध्यक्षपदही मिळाले आहे. हे आपल्या देशासाठी गौरवास्पद आहे. जी-२० चं नेतृत्व मोदींनी करणे ही देखील देशवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे.महाराष्ट्रातही (Maharashtra) मुंबईसह चार जिल्ह्यांमध्ये १४ बैठका आहेत. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचे ब्रँडिंग करण्याची संधी प्राप्त झाली आहे,असेही शिंदे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या