
ठाणे | Thane
आजोबा (Grandfather) हा आपल्या नातवाचा (Grandson) पहिला मित्र असतो असे म्हटले जाते. त्यामुळे आजोबा आणि नातवाचं नातं वेगळचे मानले जाते. असचं एक आजोबा आणि नातवाचं नातं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नातू रुद्रांश यांच्यात पाहायला मिळाले आहे...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे होळीचा सण (Holi Festival) साजरा करण्यासाठी ठाण्यातील (Thane) आपल्या निवासस्थानी आले होते. त्यावेळी नातू रुद्रांशने आजोबांकडे दुकानातून (Shop) काही तरी घेऊन देण्याचा हट्ट धरला. त्यानंतर नातवाने हट्ट करताच आजोबाही लगेच त्याला दुकानात घेऊन गेले.
यानंतर एकनाथ शिंदेंनी रुद्रांशला (Rudransh) चेंडू घेऊन दिला. तितक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि ठाण्याचे खासदार श्रीकांत शिंदेही (Shrikant Shinde) तिथे पोहोचले. त्यावेळी त्यांनी पैसे काढून दुकानदाराला दिले. यावेळी आपल्या दुकानात थेट राज्याचे मुख्यमंत्री आल्याचे पाहून दुकानदारही पूर्ण भारावून गेला होता.
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत राज्यातील सर्व नागरिकांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rains) नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.