Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्र्यांची अशीही संवेदनशीलता; महावितरणच्या कर्मचाऱ्याला तातडीने मदत

मुख्यमंत्र्यांची अशीही संवेदनशीलता; महावितरणच्या कर्मचाऱ्याला तातडीने मदत

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) महावितरणचा आदर्श कर्मचारी म्हणून गेल्या महिन्यात ज्याची ओळख निर्माण झाली आणि सोशल मीडिया (Social Media) तसेच महावितरणच्या सर्वच स्तरातील अधिकाऱ्यांनी गौरविलेल्या कंत्राटी कर्मचारी अमोल जागले (Amol Jagle) याचा कर्तव्य बजावताना अपघात (Accident) झाला. अपघातात या घटनेत तो गंभीर जखमी झाला…

- Advertisement -

दरम्यान नाशिकमधील एका खाजगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी आणले गेले. सोशल मीडियाद्वारे त्याच्या घरच्यांनी, मित्रमंडळींनी मदतीचे आवाहन केले.

Video : सांगा आमचं काय चुकलं?; शाळा बंद, चिमुकल्यांची १५ किमीची पायपीट

ही बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यापर्यंत पोहचताच विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे (Mangesh Chiwte) तातडीने नाशिकला (Nashik) येत जागले कुटुंबीयांना धीर दिला. तसेच रुग्णालयाला २ लाख रुपयाचा धनादेश देत इथून पुढचा सर्व खर्च मुख्यमंत्री सहायता निधी आणि श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे करण्यात येणार असल्याचे सांगितले.

अथक प्रयत्नाअंती बुडालेल्या युवकाचा मृतदेह हाती; ‘पाहा’ थक्क करणारा व्हिडीओ…

याच दरम्यान दिवस रात्र मेहनत करताना अपघात होणाऱ्या महावितरणच्या सर्वच कंत्राटी कर्मचाऱ्यासाठी वैद्यकीय मदत कशी उपलब्ध करायची याबाबतदेखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे देखील मंगेश चिवटे यांनी यावेळी सांगितले.

Video : …तर राऊतांना आमच्या शुभेच्छाच; भुजबळांनी सांगितला अनुभव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ही मदत प्राप्त झाल्याने जागले कुटुंबीय तसेच नातेवाईक, मित्र मंडळी यांच्याकडून मुख्यमंत्र्यांच्या तत्परतेचे आणि संवेदशीलतेचे प्रांजळपणाने कौतुक होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या