मंत्रिमंडळ विस्तार कधी? मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

मंत्रिमंडळ विस्तार कधी? मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

नवी दिल्ली । New Delhi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे कालपासून दिल्ली (Delhi) दौऱ्यावर आहेत. भाजपच्या (BJP) पाठींब्याने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच दिल्ली दौऱ्यावर गेले असून या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) भाजप अध्यक्ष जे पी नड्डा (BJP president JP Nadda) संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath singh) यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्रिमंडळ विस्तारासह विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला...

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, दिल्लीचा दौरा ही सदिच्छा भेट असून आम्हाला दिल्लीतील सर्वच नेत्यांनी शुभेच्छा देत पाठिशी समर्थपणे उभे असल्याचं म्हटले आहे. तसेच आम्ही लोकांच्या मनातील सरकार स्थापन केले असून या सरकार स्थापनेत फडणवीसांचे मोठे योगदान आहे. नड्डा साहेबही संपर्कात होते. सेना - भाजपने युतीत निवडणूक लढवली. त्यामुळे हे लोकांच्या मनातील सरकार आहे. राज्याच्या विकासात केंद्राचा मोठा वाटा आहे. आम्ही गद्दारी केली नाही, तर आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले की अन्याय सहन करायचा नाही, असेही शिंदेनी यावेळी सांगितले.

तसेच पुढे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलतांना शिंदे म्हणाले की, उद्या आषाढी एकादशी झाली की मी आणि देवेंद्र फडणवीस मुंबईत Mumbai) भेटून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (cabinet expansion) चर्चा करणार असून अधिवेशनाआधी मंत्र्यांचा शपथविधी होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

तर दुसरीकडे आज शिवसेना खासदार संजय राऊत (shivsena MP Sanjay Raut) यांनी नाशिकमध्ये बोलताना “शिवसेना आमच्याच बापाची आहे. त्यांना ५० खोके पचणार नाहीत. थोड्या दिवसात सगळ्यांना जुलाब सुरु होतील” असे म्हटले होते. त्यानंतर राऊतांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले असून “फक्त ५०? पण ५० खोके कसले? मिठाईचे की अजून कसले?” असा प्रश्न विचारत टोला लगावला आहे.

ते पुढे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाची (OBC Reservation) याचिका सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court) असून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे जेष्ठ वकील तुषार मेहता (Tushar Mehta) यांनी राज्याचे प्रतिनिधित्व करावे, यासाठी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com