Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर; 'हे' आहे कारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर; ‘हे’ आहे कारण

नाशिक | Nashik

काल जिल्ह्यातील काही भागांत अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अचानक हजेरी लावल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाच्या या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडला असून शेतकऱ्याला आधार देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत.

- Advertisement -

पारस दुर्घटना प्रकरण : सरकार मृतांच्या वारसांना मदत करणार; फडणवीसांची माहिती

काल झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सटाणा (Satana) देवळा (Deola) नांदगाव (Nandgaon) सिन्नर (Sinner) यासह आदी तालुक्यांत गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून काढणीला आलेला गहू, हरभरा, उन्हाळ कांदा, भाजीपाल्यासह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.

‘त्या’ वादग्रस्त व्हिडिओवर दलाई लामांनी व्यक्त केली दिलगिरी, म्हणाले….

दरम्यान, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आज नाशिक दौऱ्यावर येत असून जिल्ह्यातील अनेक भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या