Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याआरे कारशेडवरील बंदी उठवली, मेट्रोचा मार्ग मोकळा

आरे कारशेडवरील बंदी उठवली, मेट्रोचा मार्ग मोकळा

मुंबई | Mumbai

आरे कारशेडवरील (Aarey Metro Car Shed) बंदी उठवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतला आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे…

- Advertisement -

आरेमध्ये कारशेड करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात निर्णय झाला होता. मात्र, यावर महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) स्थगिती आणली होती.

ही स्थगिती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली आहे. आता आरे कारशेडच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरू झाल्या आहेत.

…अखेर अनुराधा सिनेमागृह जमीनदोस्त; जाणून घ्या ४७ वर्षांचा इतिहास

महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) आरे कॉलनीत (Aarey Colony) होणारा कारशेडचा प्रकल्प रद्द केला होता.

त्यानंतर शिंदे सरकारने (Shinde Government) पहिल्याच बैठकीत हा निर्णय फिरवत पुन्हा एकदा मेट्रो 3 चे कारशेड हे आरे कॉलनीमध्येच होणार असल्याचे याआधी जाहीर केले होते. यानंतर आज आरे कारशेडवरील बंदी हटवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या