CM Eknath Shinde : फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन' व्हिडीओवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

CM Eknath Shinde : फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन' व्हिडीओवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मुंबई | Mumbai

काल महाराष्ट्र (Maharashtra) भाजपच्या (BJP) अधिकृत 'एक्स' (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांचा 'नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन,' अशा आशयाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. यानंतर काही वेळातच भाजपने सावध भूमिका घेत हा व्हिडिओ डिलिट केला होता. त्यानंतर आता या व्हिडीओवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे....

CM Eknath Shinde : फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन' व्हिडीओवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, २० कोटींची मागणी

मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, "मी भाजपने ट्वीट केलेला व्हिडीओ पाहिलेला नाही, व्हिडीओ बघावा लागेल असे त्यांनी म्हटले. तसेच शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत वगळता इतर कुठल्याही नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपने असा व्हिडिओ का ट्विट केला हे त्यांच्या नेत्यांना विचारावे लागेल, असे मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी सांगितले.

दुसरीकडे भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी देखील फडणवीसांच्या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, एका ट्वीटवरुन काहीही संकेत दिले जात नाहीत. यातून कोणताही संकेत देण्यात आला नाही, असे दरेकर यांनी म्हटले. तसेच देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ ट्वीट केल्यानंतर अनेकांनी शपथविधी कधी आहे? असाही प्रश्न विचारला जात आहे. तर नेटकऱ्यांकडून या व्हिडीओबद्दल प्रश्न विचारण्यात येऊ लागल्यावर भाजपकडून हा व्हिडीओ डिलीट करण्यात आला.

CM Eknath Shinde : फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन' व्हिडीओवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
देशदूत विशेष : कुणाचा दसरा मेळावा पॉवरफुल्ल? सोशल मीडियावर जोरदार चर्चा

व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हटलं?

नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन... या शीर्षकाखाली महाराष्ट्र भाजपने देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ ट्वीट केला होता. ३१ सेकंदाचा हा व्हिडीओ होता. यामध्ये मी पुन्हा येईन... नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, मी पुन्हा येईन... गावांना जलयुक्त करण्यासाठी, मी पुन्हा येईन... शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी..., असं देवेंद्र फडणवीस बोलताना दिसून येत होते.

फडणवीसांनी 'मी पुन्हा येईन' म्हटली होती कविता

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा 'मी पुन्हा येईन' या वाक्याचा पुनरुच्चार केला होता. तसेच एका कार्यक्रमात त्यांनी ही कविता म्हटली होती. यावरुन त्यांच्यावर बरीच टीका देखील झाली होती. अनेकांनी त्यांना ट्रोल देखील केले होते.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

CM Eknath Shinde : फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन' व्हिडीओवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
महाराष्ट्र सदन प्रकरण : पंकज, समीर भुजबळांसह सहा जणांना झटका
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com