Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे सरकारने पुन्हा केलं औरंगाबाद, उस्मानाबादचं नामांतर

शिंदे सरकारने पुन्हा केलं औरंगाबाद, उस्मानाबादचं नामांतर

मुंबई l Mumbai

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयांना नव्याने स्थापन झालेल्या सरकारने स्थगिती दिली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

- Advertisement -

औरंगाबादचे नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले होते. पण, आता शिंदे सरकारने त्यात ‘छत्रपती’ या शब्दाची भर घालत ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर केले आहे. तसेच, उस्मानाबादचे नामांतरदेखील पुन्हा धाराशिव करण्यात आले आहे.

तसेच नवी मुंबई विमानतळाचं नामकरण लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असं करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या