Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे,फडणवीस, राणे घेणार पंतप्रधान मोदींची भेट ?

शिंदे,फडणवीस, राणे घेणार पंतप्रधान मोदींची भेट ?

मुंबई | Mumbai

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून (Vedanta Foxconn project) राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यानंतर आता या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे..

- Advertisement -

केंद्रीय लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Minister Narayan Rane) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये वेदांता प्रकल्पावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी सरकावर टीकेची झोड उठवली असून शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये (Gujarat) गेल्याचे प्रकरण ताजे असताना रायगड जिल्ह्यातील (Raigad district) प्रस्तावित बल्क ड्रग्ज पार्कही (Bulk Drugs Park) गुजरातमध्ये नेल्याचा आरोप माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरेंनी (MLA Aditya Thackeray) केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या