Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याEknath Shinde : "बोलून मोकळं व्हायचं"; मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, ठाकरे गटाच्या...

Eknath Shinde : “बोलून मोकळं व्हायचं”; मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, ठाकरे गटाच्या खासदाराचा निशाणा

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंतरवाली सराटी गावामध्ये (Antarwali Sarati Village) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तब्बल पंधरा दिवस अन्न आणि पाण्याचा त्याग करत उपोषण (Hunger Strike) सुरु केले होते. त्यांच्या या उपोषणाला शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह सत्तेतील अनेक नेत्यांनी भेट देत बळ दिले होते.

- Advertisement -

Nashik News : त्र्यंबकचा कचरा डेपो ठरतोय नागरिकांसाठी डोकेदुखी

यानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मंत्री संदिपान भुमरे, अर्जुन खोतकर या राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत मनधरनी करत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, त्यावेळी त्यांना जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात अपयश आले होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी काल सरकारला महिनाभराच वेळ देत उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Accident News : ट्रक-बसचा भीषण अपघात! ११ प्रवासी ठार, अनेकजण जखमी

तर दुसरीकडे मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वारंवार सांगितले आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंतीही केली होती. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. त्या व्हिडीओवरून आता या तिघांनाही ट्रोल केलं जातं आहे.

नेमकं काय म्हटलं आहे व्हिडिओमध्ये?

मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत जी चर्चा झाली त्याबद्दलची भूमिका पत्रकार परिषदेत मांडण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात एक संवाद झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की “आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.” असे म्हटले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले “हो,येस”. त्यानंतर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माईक चालू आहे.” असा तिघांमध्ये हा संवाद झाला. त्यानंतर आता संवादावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल केले जातं असून ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

INDIA Alliance Meeting: शरद पवारांच्या निवासस्थानी समन्वय समितीची महत्वाची बैठक; ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता?

ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर काय म्हणाले?

मराठा आरक्षणासाठी काल रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे. मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव पोटतिडकीने राज्यभर आंदोलन करीत आहेत. अनेकांनी अन्नत्याग केला आहे. विविध माध्यमातून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न आपला मराठा तरुण करताना दिसतो आहे. तरीही हे सरकार केवळ वेळकाढूपणा करीत आहे. एकीकडे समाज जीवन मरणाचा संघर्ष शांततेच्या माध्यमातून करीत असताना सरकारचे हे ट्रीपल इंजिन बघा किती गांभीर्याने हा विषय घेत आहेत. आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा पण, किमान जखमेवर मीठ तरी चोळू नका. समाज आता तुमच्याकडे डोळसपणे बघतोय, असे ट्वीट ओमराजेंनी केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या