मी मुलाखत देईल तेव्हा राजकीय भूकंप; मुख्यमंत्र्यांचा घणाघात

मी मुलाखत देईल तेव्हा राजकीय भूकंप; मुख्यमंत्र्यांचा घणाघात

आनंद दिघेंबाबत लवकरच मोठा खुलासा

नाशिक | Nashik

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) 'शासन आपल्या दारी' या महाराष्ट्र दौऱ्याला (Maharashtra Tour) आजपासून मालेगावमधून (Malegaon) सुरुवात झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उदघाटन झाले. त्यानंतर त्यांनी मालेगाव येथे मेळाव्याला उपस्थित राहत कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले..

यावेळी ते म्हणाले की, आमच्या उठावाची दखल ३३ देशांनी घेतली. गद्दारीचा शिक्का आमच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच धर्मवीर आनंद दिघेंबाबत काय राजकारण झाले याचा खुलासा लवकरच करेल असा इशाराही त्यांनी ठाकरेंना दिला. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीशी मैत्री करू नका असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. परंतु त्यांच्या विचारांशी प्रतारणा झाल्याने आम्ही वेगळा मार्ग निवडला. याशिवाय राष्ट्र्वादीकडून पराभूत उमेदवारांना जास्त निधी दिला गेला हा शिवसैनिकांवरील अन्याय असल्याचेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंसमोर अनेक वेळा भूमिका मांडल्या परंतु ठाकरेंनी भूमिका समजून न घेतल्याने आम्ही उठाव केला. आम्ही उठाव केल्यानंतर आमच्यावर नको नको ते आरोप केले गेले. शिवसेना अशीच मोठी झाली नसून शिवसेना मोठे करण्यासाठी आम्ही जीवाची बाजी केली असेही ते म्हणाले. तसेच विश्वासघात तुम्ही केला की मी याचा विचार ठाकरेंनी करावा असेही त्यांनी सांगितले.

तसेच मी जेव्हा मुलाखत घेईल तेव्हा राजकीय भूकंप होईल असेही ते म्हणाले. याशिवाय मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा केली असेही शिंदे म्हणाले. तसेच आम्ही गद्दारी केली असती तर आम्हाला राज्यातून एवढा प्रतिसाद कसा मिळाला असता याचा विचार करा असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com