Maratha Reservation : "ज्याचा हेतू शुद्ध, प्रामाणिक असतो, त्याच्या....; मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

Maratha Reservation : "ज्याचा हेतू शुद्ध, प्रामाणिक असतो, त्याच्या....; मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

जालना | Jalna

जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंबड तालुक्यामधील (Ambad Taluka) अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे गेल्या १७ दिवसांपासून उपोषण (Hunger Strike) सुरू होते. राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यासाठी सातत्याने शिष्टमंडळ देखील पाठविले जात होते. पंरतु, या शिष्टमंडळाला त्यांची मनधरणी करतांना अपयश येत होते.

त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अंतरवाली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपोषणस्थळी पोहोचताच मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूत काढल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण सोडले.

Maratha Reservation : "ज्याचा हेतू शुद्ध, प्रामाणिक असतो, त्याच्या....; मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
मोठी बातमी! तब्बल १७ दिवसांनी मनोज जरांगेंनी सोडलं उपोषण; मुख्यमंत्र्यांची यशस्वी मध्यस्थी

यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, उपोषण सोडले असले तरी आंदोलन सुरुच राहणार आहे. मराठा समाजाला (Maratha Community) सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील. मी समाजाच्या हिताचाच निर्णय घेईन. मराठा समाजाला मी आरक्षण मिळवून देईन आणि तीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची क्षमता कोणात असेल तर ती फक्त मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला आंदोलन शांततेत करायचे आहे, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारची भूमिका (Role of State Government) मांडली. ते म्हणाले की, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जरांगे, त्यांची टीम, त्यांचे कुटुंबीयांना मी धन्यवाद द्तो. तो समाजासाठी लढतोय, यामध्ये त्यांचा वैयक्तिक फायदा नाही, मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी सरळ भूमिका मांडली. जरांगे पाटील यांच्या वडिलांना मी सांगितले, की त्यांचा पोरगा भारी आहे. समाजासाठी लढत आहे. हेतू प्रामाणिक असला की जनता प्रमाणिकपणे मागे उभी राहते. त्यामुळे सर्वांनी जरांगेंना पाठिंबा दिला. मी त्यांना उपोषण सोडण्याची मागणी केली. त्यांनी सरबत घेतला त्याबद्दल मी आभारी आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत शासनाची भूमिका स्पष्ट आहे, असे त्यांनी म्हटले.

Maratha Reservation : "ज्याचा हेतू शुद्ध, प्रामाणिक असतो, त्याच्या....; मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
राहुल नार्वेकरांनी घटनेशी द्रोह केला; संजय राऊतांचे टीकास्त्र

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने याआधी मराठा समाजाला आरक्षण १६ आणि १७ टक्के दिले होते. पण सर्वोच्च न्यायालयात कायदा केला आणि ते आरक्षण रद्द झाले. जेव्हा आरक्षण रद्द झाले त्यावेळी ३७०० मुलांच्या मुलाखती झाल्या होत्या, त्यांना नोकऱ्या देण्याचे धाडसं आम्ही केले. जे फायदे ओबीसीला मिळतात ते फायदे मराठ्यांना देण्याचे काम आम्ही केले. पण रद्द झालेले आरक्षण आपल्याला मिळाले पाहिजे अशी भूमिका सरकारची सुद्धा आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाला अधिकार मिळाला पाहिजे. मराठ्यांचे दुसऱ्या जातीशी कोणतेच मतभेद नाहीत. त्यामुळे रद्द झालेले आरक्षण देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, मराठा समाजाला आरक्षण देण्यात सरकार कटिबद्द आहे, कुणावरही अन्याय न करता आम्ही ते देणार. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही मनोज सारखे स्वस्थ बसणार नाही. मराठा समाज आणि सरकार काही वेगळे नाही. प्रोटोकॉल बाजूला ठेवून मनोजला भेटायचे हे मी ठरवले होते, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

Maratha Reservation : "ज्याचा हेतू शुद्ध, प्रामाणिक असतो, त्याच्या....; मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
नाशिककरांनो! 'या' दिवशी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद; 'हे' आहे कारण
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com