मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीचे स्टेअरिंग फडणवीसांच्या हाती

मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीचे स्टेअरिंग फडणवीसांच्या हाती

मुंबई | Mumbai

राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट आणि भाजपचे (Shinde group and BJP) सरकार आले असून या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद हे शिंदे गटाकडे देण्यात आले आहे. सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असून शिंदे सरकारवर अंकूश ठेवण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याची चर्चा आहे...

तर शिंदे सरकारचे स्टेअरिंग भाजपच्या हाती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (DCM Devendra Fadnavis) हाती असल्याची टीका विरोधक नेहमी करतात. त्यानंतर आता याचा प्रत्यय आज (दि.४) रोजी समृध्दी महामार्गाच्या (Samruddhi Highway) पाहणी दौ-याच्या निमित्ताने आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शिंदे सरकारचे स्टेअरिंग फडणवीसांच्या हाती आहे का? अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

११ डिसेंबरला समृध्दी महामार्गाच्या ५२० किलोमीटर नागपूर- शिर्डी (Nagpur to Shirdi) पर्यंतच्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी आज (दि.४) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर-शिर्डी मार्गाचा पाहणी दौरा नागपूरपासून सुरू केला. त्यावेळी फडणवीस यांनी कारची स्टेअरिंग आपल्या हातात घेतली. तर कारमध्ये मुख्यमंत्री शिंदे हे शेजारी बसले आहेत.

दरम्यान, याआधी जेव्हा मुख्यमंत्री शिंदे हे मविआ सरकारमध्ये मंत्री होते, त्यावेळी त्यांनी मर्सिडिज ईलेक्ट्रिक कारने समृद्धी महामार्गाची पाहणी केली होती. तेव्हा खुद्ध शिंदे यांनी कार चालवली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांच्यासोबत पहिल्यांदाच प्रवास करत आहे. तसेच फडणवीस आणि शिंदे ज्या कारने प्रवास करत आहे, त्या कारची किंमत दीड ते २ कोटींच्या घरात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com