Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमैला साफ करताना पाच जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

मैला साफ करताना पाच जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

मुंबई | Mumbai

शेतातील एका घरातील सेप्टिक टँकमधील मैला साफ करण्यासाठी सहा कामगार दुपारी तीन वाजता सेफ्टीटँकमध्ये उतरले. रात्री दहा वाजेपर्यंत त्यांचे काम सुरु होते, पण यातील वायूमुळे पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला तर एक कामगार गंभीर अवस्थेत होता.

- Advertisement -

त्याला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मृत्यू पावलेले पाचही लोक एकाच कुटुंबातील असल्यानं कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहराजवळील भाऊचा तांडा येथे ही घटना घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमी झालेल्या कामगारावर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार शासनाच्या खर्चातून करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी आज दिले”

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मृत झालेल्या मजुरांची यादी

1) शेख सादेक (45)

2) शेख शाहरुख (19)

3) शेख जुनेद (29)

4) शेख नवीद (25)

5) शेख फिरोज (19)

- Advertisment -

ताज्या बातम्या