Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर; नेमकं कारण काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर; नेमकं कारण काय?

मुंबई | Mumbai

काल दसरा मेळावा (Dasara Melava) झाल्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे तातडीने दिल्लीसाठी (Delhi) रवाना झाले आहेत. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुखमंत्री फडणवीस हे मुंबई विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले असून दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे मात्र मुंबईतच असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस अचानकपणे दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे….

- Advertisement -

दसरा मेळाव्यावरुन परतणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांच्या बसचा अपघात; २५ जण जखमी

याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदे-फडणवीसांच्या या दिल्ली दौऱ्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. तसेच महामंडळ वाटप, आमदार अपात्रता प्रकरण आणि सध्या राज्यभर गाजत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यामुळे आता या सर्व मुद्द्यांवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

Maratha Reservation : मंत्री गिरीश महाजनांचा मनोज जरांगे पाटलांना फोन; म्हणाले, उपोषण…

दरम्यान, दुसरीकडे आजपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंतरवली सराटी गावात आमरण उपोषणास (Hunger Strike) सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने कायदा करून आरक्षण मर्यादा वाढवावी अशी मागणी केली जात आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी देखील पंतप्रधान मोदींकडे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता यासंदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nilesh Rane : निलेश राणेंचा राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय मागे; फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर मंत्री रवींद्र चव्हाणांचे स्पष्टीकरण

- Advertisment -

ताज्या बातम्या