
मुंबई |Mumbai
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) यांनी मागील आठवड्यात सांगली जिल्ह्यातील (Sangli District) जतमधील (Jat)४० गावांचा लवकरच कर्नाटकात समावेश होईल असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवा वाद सुरू झाला होता...
त्यानंतर यावरून महाराष्ट्रातील (Maharashtra) सर्वच नेत्यांनी बोम्मईंच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलन पुकारले होते. हा वाद सुरू असतांनाच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली. यावरून आता बोम्मईंनी पुन्हा एकदा ट्वीट करत महाराष्ट्रातील नेत्यांना थेट इशारा दिला आहे.
बोम्मई यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने याआधीही असे प्रयत्न केले आहेत. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टात आमची बाजू भक्कम आहे. सीमावादावर आमचे सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, असे बोम्मई म्हणाले आहेत.
तसेच पुढील दोन दिवसात कर्नाटकच्या खासदारांसह (MP)आपण अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली आहे. अमित शाह यांच्यासमोर आपण राज्याची कायदेशीर भूमिका मांडणार असल्याचे बोम्मई यांनी सांगितले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने (Mahavikas Aghadi) गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतल्यानंतर शाहा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याशी दिल्लीत चर्चा करू,असे आश्वासन दिले आहे.