Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा नवा दावा; म्हणाले, सोलापूर आणि अक्कलकोट...

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा नवा दावा; म्हणाले, सोलापूर आणि अक्कलकोट…

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी (Maharashtra-Karnataka border issue) राज्य सरकारच्या झालेल्या बैठकीनंतर कर्नाटकचे (karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) आक्रमक झाले असून त्यांनी आता महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या मुद्द्यावर चिथावणीखोर विधान केले आहे…

- Advertisement -

बोम्मई म्हणाले की, कर्नाटकच्या सीमाभागातील कोणतीही जागा देण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट महाराष्ट्रातील सोलापूर (Solapur) आणि अक्कलकोटसारखे (Akkalkot) कन्नड भाषिक भाग आमच्यात समाविष्ट केले पाहिजेत. तसेच २००४ पासून महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आतापर्यंत त्यांना यश आलेले नाही आणि मिळणारही नाही. आम्ही कायदेशीर लढ्यासाठी तयार आहोत, असे त्यांनी सांगितले आहे.

आत्मविश्वास नसला की ज्योतिषाकडे…; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी सीमावादावर केलेल्या विधानावर बोलतांना बोम्मई म्हणाले की, फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या मुद्द्यावर चिथावणीखोर विधान केले असून त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.

राऊतांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिला ‘हा’ इशारा

दरम्यान, जत तालुक्यातील (Jat Taluka)४२ ग्रामपंचायतींनी काही वर्षापूर्वी केलेल्या ठरावाचा दाखला देत बोम्मई यांनी या गावांना कर्नाटकमध्ये सामील करुन घेणार असल्याचे म्हटले आहे. या ठरावांचा कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करत आहे असेही बोम्मई यांनी म्हटले आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकाराने महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या