Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानिफाडमधील 'या' भागात ढगफुटी सदृश्य पाऊस, पिकांचे मोठे नुकसान; पाहा व्हिडीओ...

निफाडमधील ‘या’ भागात ढगफुटी सदृश्य पाऊस, पिकांचे मोठे नुकसान; पाहा व्हिडीओ…

पालखेड मिरचीचे | वार्ताहर

पालखेड परिसरात आज चार वाजेच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस (Heavy Rain) झाल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे एक तास पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या, याचा परिणाम मका, सोयाबीन, टोमॅटो या पिकांवर तसेच नुकतेच सुरू असलेल्या द्राक्ष बाग छाटणीवर होणार आहे…

- Advertisement -

द्राक्षहंगाम सुरू झाल्याने छाटण्यांची कामेही सुरू झाली असून, छाटणी केलेल्या काहि द्राक्षउत्पादकांच्या द्राक्ष बागेला नविन फुटवा येत असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

अचानक आलेल्या या आसमानी संकटाने टोमॅटो, मका, सोयाबीन यांसारख्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्यावर देखील मोठ्या प्रमाणत परिणाम होत आहे.

या जोरदार पावसामुळे सर्व शेतकऱ्यांच्या मनावर काळजीचे सावट निर्माण झाले आहे. ढगफुटीसदृश्य पावसाने पालखेड परीसरातील काहि रस्त्यातील वाहतुक ठप्प झाली होती

- Advertisment -

ताज्या बातम्या