शिर्डीत ढगफुटीसदृश पाऊस, नागरिकांची उडाली दाणादाण

शिर्डीत ढगफुटीसदृश पाऊस, नागरिकांची उडाली दाणादाण

शिर्डी | प्रतिनिधी | Shirdi

एक महिन्याच्या विश्रांतीनंतर श्री गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) शिर्डीसह (Shirdi) परिसरात ढगफुटी सदृश पाऊस (cloudburst Rain) पडल्याने शहरातील जनजीवन विस्कळित झाले असून पावसाचे पाणी (Rain Water) घरात घुसल्याने लक्ष्मीनगरमधील (Laxminagar) सुमारे दिडशे कुटुंब रात्रीपासून रस्त्यावर आले आहे. तर नगर मनमाड महामार्गावर (Nagar Manmad Highway) पाण्यामुळे वाहतूक कोंडी (Traffic congestion) झाली आहे.

यंदाच्या मोसमात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. परंतू संपूर्ण श्रावण महिन्यात पावसाने विश्रांती घेतली होती.त्यानंतर बुधवार (दि.३१) रोजी रात्री शिर्डी शहरात विजेच्या कडकडाटात (lightning strike) पावसाने जोरदार सुरुवात केली होती.सतत चार पाच सुरू असलेल्या पावसाने शिर्डीत दाणादाण करून टाकली आहे.सर्वत्र जनजीवन विस्कळित झाले आहे.

नगर मनमाड महामार्गावर कंबरेएवढे पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाला आहे. तर शहरातील पश्चिम बाजूस असलेल्या उपनगरात नेहमीप्रमाणे लेंडी नाल्याचे पाणी आल्याने पुनमनगर, साईनाथ रुग्णालय, सितानगर, हेडगेवार नगर, लक्ष्मीनगर याठिकाणच्या रहिवाशांचे जनजीवन विस्कळित झाले आहे.

तसेच निमगाव हद्दीतील श्री साईबाबा महाविद्यालयात (Shri Saibaba College) जाण्यासाठी विद्यार्थी व विद्यार्थीनींना मोठी कसरत करावी लागली.त्याबरोबरच नव्याने बांधण्यात आलेल्या पोलिस ठाण्यात (police station) देखील पाणी साचल्याने अनेकांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

शासकीय विश्रामगृह देखील पाण्यात आहे.तसेच हॉटेल सन एन सॅड कडे जाणारा मार्ग तुर्तास बंद करण्यात आला आहे.एकंदरीतच काल झालेल्या पावसामुळे शिर्डी शहरात दाणादाण उडाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com