Sunday, April 28, 2024
Homeदेश विदेशगुजरातमध्ये पावसाचे थैमान ; पाण्याच्या प्रवाहात गाड्यांसह, जनावरे वाहून गेली

गुजरातमध्ये पावसाचे थैमान ; पाण्याच्या प्रवाहात गाड्यांसह, जनावरे वाहून गेली

गुजरात | Gujrat

गुजरातमध्ये पावसाची (Gujrat Flood) संततधार सुरू असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जुनागढ आणि नवसारीत पावसामुळे महापूर आला असून घरांमध्ये पाणी शिरले आहे. गुजरातमधील पावसामुळे धरणे आणि नद्यांची पाणी पातळी धोकादायक पातळीपर्यंत वाढल्याने अनेक गावांचा सपर्क तुटला. तसेच राज्यातील अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी आणि रहिवाशांची गैरसोय झाल्याचे पाहयला मिळाले.

- Advertisement -

अहमदाबाद आणि जुनागडसह (Ahamdabad & Junagadh) गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, अहमदाबाद-जुनागडमध्ये पाऊस थांबल्याने परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. परंतु रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

घराबाहेर उभ्या असलेल्या गाड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात आहे. अहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्येही पूर आला असून, त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. शनिवारी रात्री सिव्हिल हॉस्पिटलच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये पाणी साचले होते, मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

तलावात बस कोसळून भीषण अपघात ; १७ जणांचा जागीच मृत्यू

नवसारी जिल्ह्यात चार तासात १३ इंच पावसामुळे पूर आला आहे. सखल भागात घरांमध्ये पाच फुटांपर्यंत पाणी भरले आहे. रस्ते बंद झाल्याने संपर्क तुटला आहे. गिरनार आणि दातार पर्वतावर मुसळधार पाऊस असल्याने कालवा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. हवामान विभागाने आज भावनगर, नवसारी आणि वलसाडमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान जुनागड शहर पावसामुळे संपूर्ण जलमय झाले होते. १९८३ नंतर प्रथमच येथे इतक्या पावसाची नोंद झाली आहे. रायजीबाग म्हणजेच जुनागडचा पॉश एरिया येथे पावसामुळे महागडी वाहनेही खेळण्यांसारखी वाहू लागली. त्याचवेळी पुराच्या पाण्यात म्हशीही अडकल्या होत्या. आता रस्त्यांवरून पाणी ओसरले असले तरी परिस्थिती अजूनही बिकट आहे. एकमेकांवर वाहनांचे ढीग पडले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जुनागडमध्ये ८ तासांत २१९ मिमी पाऊस झाल्याने शहराला मोठा फटका बसला आहे. त्याठिकाणी उभ्या केलेल्या गाड्या आणि गुरे वाहत्या पाण्यात वाहून गेली, तसेच नागरिकही खोल पाण्यातून सुरक्षित ठिकाणी पोहोचताना दिसले. याशिवाय सखल भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बचाव पथके तैनात करण्यात आली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या