मनपाच्या पेट्रोल पंपाला टाळे; कोट्यवधींचा भूर्दंड

पेट्रोल
पेट्रोल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मनपाच्या वाहनांकरीता स्वत:चा पेट्रोल पंप (Petrol pump) उभारणे महापालिकेला (Municipal Corporation) चांगलेच महागात पडले आहे.

खासगी पेट्रोलपंपाच्या तुलनेत भारत पेट्रोलियम कंपनीने (Bharat Petroleum Company) महापालिकेच्या पेट्रोल पंपासाठी करताना प्रतिलिटर 13 रुपये अधिक दर आकारुन डिझेल पुरवठा (Diesel supply) केल्याने काही वर्षात महापालिकेला या इंधन खरेदीपोटी कोट्यवधींचा भूर्दंड बसला आहे.

त्यामुळे भांडार विभागाच्या अखत्यारीत असलेल्या स्वत:च्या पेट्रोल पंपाला (Petrol pump) टाळे ठोकण्याची वेळ महापालिकेवर आली असून, अखेर शहरातील खासगी पेट्रोल पंपावरून आपल्या वाहनांसाठी इंधन खरेदी सुरू केली आहे. मनपाच्या या वाहनांना पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel) पुरवठ्यासाठी महापालिकेने पंचवटी (panchavati) येथील भांडार विभागाच्या जागेत भारत पेट्रोलियम कंपनीकडून पेट्रोल-डिझेल पंप घेतले होते.

वर्षानुवर्षे याच पंपावरून महापालिकेच्या वाहनांमध्ये इंधन भरले जात होते. महापालिकेच्या वाहनांकरीता दरमहा 20 हजार लिटर डिझेलची खरेदी या पंपाच्या माध्यमातून भारत पेट्रोलियम कंपनीकडून (Bharat Petroleum Company) केली जात होती. मात्र या पंपाकरीता डिझेल पुरवठा करताना भारत पेट्रोलियम कंपनीने महापालिकेला घाऊक खरेदीदार कंपनी संबोधत 13 रुपये प्रतिलिटर जादा दराने डिझेल पुरवठा केला. त्यामुळे खासगी पंपधारकाच्या तुलनेत महापालिकेला दरवर्षी सुमारे 32 लाखांचा भूर्दंड सहन करावा लागत होता.

महापालिकेच्या अखत्यारीत लहान मोठी 213 वाहने आहेत. यात अधिकारी, पदाधिकाजयांच्या आलीशान चारचाकींसह ट्रक, डंपर, रुग्णवाहिका, शववाहीका, अग्निशमन बंब आदी वाहनांचा समावेश आहे. अखेर इंधन पुरवठा (Fuel supply) अधिकाधिक स्वत: दरात होण्यासाठी मनपाने पंपधारकांकडून देकार मागविले आहेत. सद्यस्थितीत पालेजा पेट्रोलपंपावरून महापालिकेच्या वाहनांमध्ये इंधन भरले जात असून पालिकेला अधिक स्वस्त दरात इंधन उपलब्ध होण्याकरीता पेट्रोलपंप चालकांकडून स्पर्धात्मक दर मागविण्यात आले आहेत.

निविदेला तीन वेळा मुदतवाढ

इंधन पुरवठ्यासाठी महापालिकेने खासगी पंपचालकांकडून दर मागविले आहेत. मात्र तब्बल दोन वेळा निविदा सूचना प्रसिध्द करून देखील महापालिकेला इंधन पुरवठादार पंप चालकांकडून कुठलाही प्रतिसाद मिळू शकलेला नाही. त्यामुळे महापालिकेने आता तिसर्‍यांदा मुदतवाढ देत दर मागविले आहेत. 11 जानेवारीपर्यंत निविदा दर सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com