पुढील एक आठवडा खराब वातावरण - द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंता

पुढील एक आठवडा खराब वातावरण - द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंता

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यात पुढील एक आठवडा खराब वातावरण राहणार असून काही भागात धुके (Fog), दव आणि ढगाळ हवामान राहणार आहे. विदर्भ (Vidarbha) मराठवाडा (Marathwada) काही भागात किरकोळ ठिकाणी पाऊस (Rain) होईल. उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) सोमवारी (दि.14 ) नाशिक (Nashik), धुळे (Dhule),जळगाव (Jalgaon), नंदुरबार (Nandurbar), अहमदनगर (Ahemadnagar), औरंगाबाद (Aurangabad) या भागात पुढील एक आठवडा अधून मधून सर्वत्र ढगाळ हवामान राहिल तर दुपारी उन्हाचा चटका जास्त राहिल,असा अंदाज हवामान अभ्यासक विजय जायभावे (Vijay Jaybhave) यांनी वर्तविला आहे....

यामुळे द्राक्ष उत्पादक (Grapes farmers) चिंतेत आहे. उत्तर भारतात काश्मीर (Kashmir), हिमाचल (Himachal Pradesh), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Punjab), हरियाणा (Haryana), दिल्ली (Delhi) या भागात पुढील एक आठवडा एका पाठोपाठ एक पश्चिमि चक्रवात येणार असल्यामुळे अवकाळी पाऊस आणि खराब वातावरण राहणार आहे. शुक्रवार दि.18,19,20 फेब्रुवारी पासून थंडीची तीव्रता कमी होत जाईल. पुढील काही दिवसात थंडी कमी होत जाणार आहे.

तसेच या महिन्यात अधून मधून ढगाळ हवामान होईल व किरकोळ ठिकाणी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) होईल. उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) सोमवार दि.14 फेब्रुवारीला नाशिक (Nashik), धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यात पुढील एक आठवडा अधून मधून सर्वत्र ढगाळ हवामान राहिल दुपारी उन्हाचा चटका जास्त राहिल.

मध्य महाराष्ट्रात 14 फेब्रुवारीला पुणे (PUne), सातारा (Satara), सांगली (Sangali), सोलापूर (Solapur) जिल्ह्यात पुढील दोन दिवसात सर्वत्र ढगाळ हवामान राहिल दि.16,17,18 फेब्रुवारीला खराब वातावरण राहिल. कोकण पश्चिम महाराष्ट्र 14फेब्रुवारी कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर ढगाळ हवामान राहिल.

मराठवाडयात सोमवारी बीड (beed),लातूर (latur) ,नांदेड (nanded),परभणी (Parbhani),हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात ढगाळ हवामान तर पुढील एक आठवड्यात अधून मधून खराब वातावरण होईल किरकोळ ठिकाणी हलका पाऊस (Rain alert) होईल.अशी शक्यताही विजय जायभावे (Vijay Jaybhave) यांनी वर्तविली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com