खुशखबर! सात हजार जागांसाठी 'या' तारखेपासून होणार पोलीस भरती

खुशखबर!  सात हजार जागांसाठी 'या' तारखेपासून होणार पोलीस भरती

पुणे । Pune

मागील काही वर्षांपासून रखडलेलया पोलीस भरतीची (Police Recruitment) प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून त्यासाठी तारीख निश्चित करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी पुण्यात (Pune) एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली...

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, 'राज्यात १५ जूनपासून पोलिस भरती (Maharashtra Police) प्रक्रिया सुरू होणार आहे. गृहविभागाने (Home Department) आतापर्यंत साडेपाच हजार जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील सात हजार जागांच्या भरती प्रक्रियेला १५ जूनपासून (15 June) सुरुवात होईल. पोलिस दलातील रिक्त जागांची संख्या आणि मनुष्यबळाची गरज लक्षात घेता आणखी १५ हजार पदे भरण्याची मागणी गृहविभागाकडून मंत्रिमंडळाकडे केली जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांची भूमिका सकारात्मक असून मंत्रीमंडळाच्या मान्यतेनंतर १५ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच भरती प्रक्रियेची तारीख जाहीर केल्याने पोलिस दलातील सेवेसाठी इच्छुक तरुणांचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत (Transfer of Police Officers) बोलताना गृहमंत्री म्हणाले की, पोलिसांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय त्यांच्या बदल्या करण्यात येणार नाहीत. परंतु, प्रशासकीयदृष्ट्या आवश्‍यक तेव्हा हा निर्णय घ्यावा लागेल. पोलिस निरीक्षक (Inspector of Police) पदापर्यंतच्या बदल्यांचा अधिकार पोलिस महासंचालकांना (Director General of Police) आहे.

तसेच पोलिस उपअधिक्षक (Deputy Superintendent of Police) पदाच्या बदल्यांचे अधिकार मंत्र्यांना आहेत. भारतीय पोलिस सेवेतील (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. त्यानुसार, बदल्यांसंदर्भात योग्य ती पारदर्शकता पाळण्यात येईल, असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com