स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांनो बातमी तुमच्यासाठी; MPSC कडून 'इतक्या' जागांची भरती

एमपीएससी
एमपीएससी

मुंबई । Mumbai

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) लवकरच ४३३ जागांसाठी भरती (MPSC Recruitment 2022) करण्यात येणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे...

एमपीएससीकडून वैद्यकीय अधिकारी गट ब (Medical Officer Group B) सहाय्यक संचालक (अनुवाद आणि संज्ञा) (Assistant Director Translation and Terminologies) भाषा संचालक ((Director of Languages) या पदांसाठी ही भरती होणार आहे. तसेच पात्र उमेदवारांना mpsconline.gov.in/candidate या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२२ असणार आहे.

दरम्यान, या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना (candidates) स्वतःचा बायोडेटा (Resume) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र (Educational certificate) शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate) जातीचा दाखला (Caste certificate) (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईज फोटो ही कागदपत्र सोबत ठेवावी लागणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

१) वैद्यकीय अधिकारी गट ब (Medical Officer Group B)

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी एमबीबीएसपर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण करणे आवश्यक आहे.

२) सहाय्यक संचालक अनुवाद आणि संज्ञा (Assistant Director Translation and Terminologies)

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मराठी विषयात पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.

तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण करणे आवश्यक आहे.

३) भाषा संचालक (Director of Languages)

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मराठी विषयात पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण घेणे आवश्यक आहे.

तसेच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण करणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com