महसूल अधिकाऱ्यांचा बदलीचा मार्ग मोकळा

महसूल अधिकाऱ्यांचा बदलीचा मार्ग मोकळा

नाशिक l प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (Maharashtra Industrial Development Corporation)प्रादेशिक अधिकारीपदावर प्रतिनियुक्तीवर नेमलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा महसूल विभागात परत पाठविण्याची कार्यवाही केली आहे. त्याबाबत महसूल अधिकाऱ्यांमध्ये बदलीबाबत तर्क वितर्क लढवले जात असतानाच राज्याचे महसूल मंत्र्यांनी बदलीपात्र महसूल अधिकाऱ्यांची माहिती तत्काळ सादर करण्याच्या सूचना सचिवांना केल्या आहेत. त्यामुळे गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून बदली रखडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा रंगत आहे.

राज्यात एप्रिल, मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याचे गृहीत धरून राज्य निवडणूक आयोगाने एकाच जागेवर तीन वर्षे पूर्ण झालेल्या व सलग पाच वर्षे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या महसूल, पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती मागविली होती. त्यामुळे मे, जून मध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तविली जावून बदलीपात्र अधिकाऱ्यांची सोयीसाठी धावपळ उडाली होती.

दरम्यान, अनेकांनी लोकप्रतिनिधी, मंत्र्यांच्या शासकीय शिफारशींचे पत्रे गोळा करून महसूल विभागात फिल्डिंग लावली होती. मात्र तत्कालीन ठाकरे सरकारने या बदल्यांना जून अखेरपर्यंत स्थगिती दिली. ही स्थगिती नवीन सरकारच्या काळात अद्यापही कायम आहे. परंतु आता मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन मंत्रालयातील कामकाज सुरुळीत सुरू झाल्याने अधिकाऱ्यांच्या बदल्यांची कार्यवाही सुरू करण्यात जात आली आहे. त्यात प्रामुख्याने मंत्र्यांना लागणारे विशेष कार्य अधिकारी, स्वीय सहायक अशा महत्त्वाच्या ठिकाणी मंत्र्यांना सोयीस्कर अशा अधिकाऱ्यांच्याका सुरू झाल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com