जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

मतदार याद्यांचा कार्यक्रम घोषित
जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

नाशिक । प्रतिनिधी | Nashik
  

राज्यासह तीन वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या (Agricultural Produce Market Committees) निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक (Election) प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या मतदार याद्यांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार दि.१० फेब्रुवारीपासून मतदार याद्यांचा कार्यक्रम सुरू होणार असून, २० मार्चला अंतिम मतदारयादी जाहीर होणार आहे. यानंतर  निवडणुक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे.

कोरोना (Corona) संकटामुळे तीन वर्षांपासून बाजार समित्यांच्या निवडणुका रखडल्या आहेत. गतवर्षी बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम घोषित होऊन २९ जानेवारी २०२३ ला मतदान होणार होते. मात्र, नव्याने निवडणुका झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा मतदार यादीत समावेश न केल्याने सातारा, कोल्हापूरसह नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सदस्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

दुसरीकडे निवडणुका पुढे ढकलण्यात येऊ नये, यासाठी नागपूर खंडपीठात (Nagpur Bench) याचिका दाखल झाली होती. यावर झालेल्या सुनावणीत ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील निवडणुका घेण्याचा आदेश खंडपीठाने राज्य शासनाला दिले, राज्य शासनातर्फे तसे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले त्यामुळे 30 एप्रिल पर्यंत  निवडणुका होणार हे निश्चित झाले होते मात्र निवडणुका कधी लागणार याची इच्छुकांना प्रतीक्षा होती ती आता संपली  आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बाजार समिती यांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम घोषित केला आहे

या बाजार समित्यांची होणार निवडणूक

जिल्ह्यातील नाशिक,पिंपळगाव, लासलगाव, येवला, नांदगाव, मनमाड, मालेगाव, चांदवड, देवळा, घोटी, सिन्नर,दिंडोरी, कळवण, सुरगाणा या चौदा बाजार समितीची मुदत संपली असून या बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रम राहणार आहे.

असा आहे मतदार याद्यांचा कार्यक्रम

निवडून आलेल्या सदस्यांची नावे समाविष्ठ करणे - १० ते २४ फेब्रुवारी

सुधारित प्रारूप मतदारयादी घोषीत करणे - २७ फेब्रुवारी

प्रारूप मतदार यादीवर हरकती, आक्षेप मागविणे - २७ फेब्रुवारी ते ८ मार्च

प्राप्त हरकती, आक्षेप यावर निर्णय घेणे -८ ते १७ मार्च

अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करणे - २० मार्च

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com