Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यासिन्नरमध्ये दोन गटात हाणामारी; दंगलसदृश्य परिस्थिती

सिन्नरमध्ये दोन गटात हाणामारी; दंगलसदृश्य परिस्थिती

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

दसर्‍याच्या दिवशी मोटार सायकलला कट मारल्याची कुरापत काढून झालेल्या मारहाणीचा (beating) बदला घेण्यावरुन मळहद्द व वैदूवाडीतील युवकांमध्ये तुंबळ हाणामारीत दोन्ही गटाकडून लाठ्या-काठ्यासह, गज, दांडक्याचा सर्रास वापर झाला.

- Advertisement -

गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना (police) लाठीचार्ज (baton charge) करावा लागला. त्यानंतर गर्दी पांगली. या हाणामारीत तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात (District Hospital) उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. दसर्‍याच्या दिवशी मळहद्दीतील तटाणे नामक युवकाला मोटारसायकलने कट मारल्याची कुरापत काढून वैदूवाडीतील काही युवकांनी बेदम मारहाण केली होती.

त्यामूळे संतप्त झालेल्या मळहद्दीतील शेकडो तरुणांनी दुपारी 4 च्या दरम्यान वैदूवाडीत प्रवेश केला व मारहाण करणार्‍यांचा शोध सुरु केला. मात्र, त्याचवेळी वैदूवाडीत समाजाची बैठक सुरु समाजाच्या युवकाला मारण्यासाठी मळ्यातले तरुण आल्याचे कळताच संतप्त तरुणांनी बैठक आटोपती घेतली आणि हाताला लागेल ती लाठी-काठी, दगडे घेत मळहद्दीतल्या युवकांचा पाठलाग सुरु केला.

मळहद्दीतील तरुण गंगावेशीबाहेरील नायगाव रस्त्याकडे (naygaon raod) पळताच वैदूवाडीतील शेकडो युवक त्यांच्या मागे लागले. दोन्ही बाजुने सुरु असलेल्या या बाचाबाचीत शंकर माळी या वैदूवाडीतील युवकावर धारदार शस्त्राने झाला. शंकरला रक्तभंबाळ अवस्थेत पाहिल्यानंतर संतप्त गर्दीने मळहद्दीतील तरुणांचा पाठलाग सुरु केला. संतप्त गर्दीचा रौद्र अवतार पाहिल्यानंतर काही युवक रस्त्याच्या कडेला असणार्‍या दुकानांमध्ये शिरले.

काही दुकानदारांनी गर्दीच्या भितीने आपली शटर्स ओढून घेतली. संतप्त गर्दीने गोंदेश्वर हॉटेलचे शटर (shutter) उघडून आत लपलेल्या अनिल गाडे, शरद तुंगार, पप्पू उगले यांना पकडून जबर दिला. त्यात गाडे याच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून त्याच्या डोक्याला 6 टाके घालावे लागले. या झटपटीत हॉटेलमधील साहित्याचीही संतप्त गर्दीने तोडफोड केल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावून आले. मात्र, दोन्ही बाजूच्या संतप्त युवकांपूढे पोलिसांची संख्या अगदीच कमी होती. मात्र, त्यांच्या मदतीला अजून पोलिसांची कुमक येताच पोलिसांनी करुन गर्दीला परिसरातून पिटाळून लावले. सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अनिल गाडे, शरद तुंगार व शंकर माळी यांना स्वतंत्र रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी नाशिकला (nashik) हलवण्यात आले.

पोलिसांच्या लाठीचार्जनंतर कार्यकर्ते सैरभैर पळाले तर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिसरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद केली होती. औद्योगिक सुट्टी असल्याने भाजीबाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. काही वेळ ही गर्दी कमी झाली होती. अफवांमूळे थोडी पळापळही झाली. गर्दी दुकाने बंद करण्यासाठी येत असल्याच्या अफवा थेट बसस्थानकापर्यंतच्या दुकानांपर्यंत पोहचल्याने काहींनी घाई-घाईने दुकाने बंद केली होती. मात्र, ही अफवाच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दुकाने पुन्हा उघडण्यात आली.

दोन्ही गटाच्या विरोधात तक्रार करण्याचे काम संध्याकाळी उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात सुरु होते. मात्र, कुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेले नव्हते. गंगावेस भागात तणावाचे वातावरण होते. दुकाने बंद होती. तर कोपर्‍या-कोपर्‍यावर बघ्यांची गर्दी दिसत होती. पोलिसांचाही बंदोबस्त परिसरात वाढवण्यात आला होता. तणावाच्या या वातावरणातही भाजी बाजार पूर्वपदावर आला होता.

सदर घटनेत जखमी झालेले अनिल गाडे हे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे यांचे बंधू आहेत. तर पप्पू उगले हे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांचे बंधू आहेत. मारहाणीच्या घटनेनंतर मळहद्दीतल्या संतप्त तरुणांनी नायगाव घाटाच्या अलिकडे राहणार्‍या अंबादास शिंदे यांच्या घरावर हल्ला करुन घराचा दरवाजा, पाण्याच्या सिंटेक्स टाक्या तोडल्याचे समजते. मापरवाडी रस्त्यावरील राहूल हाटकर याची टपरीही तोडण्यात आल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या