Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशचीनचा घुसखोरीचा प्रयत्न : भारत-चीन सैनिकात झडप

चीनचा घुसखोरीचा प्रयत्न : भारत-चीन सैनिकात झडप

नवी दिल्ली :

भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये सीमेवर पुन्हा संघर्ष झाला आहे.

- Advertisement -

पूर्व लडाख भागात पॅन्गाँग सरोवराजवळ दोन्ही देशांचे सैनिक २९-३० ऑगस्ट रोजी समोरा समोर एकमेकांना भिडले. Tso Lake भागात चीनी सैनिकांकडून या भागात घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रयत्न भारतीय सैनिकांनी हाणून पाडला. लडाखमधील घुसखोरीवरुन एप्रिलपासून दोन्ही देशांत तणाव सुरु आहे. चर्चेचा अनेक फेऱ्या झाल्यानंतर अजून तोडगा निघाला नाही. त्यानंतर पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न झाला.

लडाखमध्ये ७५ दिवसानंतर तणाव निर्माण झाला आहे. लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल LOC (एलएसी) वर चीनकडून पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे. २९ ऑगस्ट रोजी चीनकडून पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न झाला. परंतु भारतीय जवानांनी चीनचा हा प्रयत्न हाणून पाडला. भारतने हे जैसे थे (Status Quo) परिस्थितीचे ‌उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या