Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याछत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा; परिस्थिती नियंत्रणात

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा; परिस्थिती नियंत्रणात

छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar

येथील किराडपुरा (Kiradpura) भागात रात्री दोन वाजेच्या सुमारास दोन गटांत राडा झाल्याने अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. त्यानंतर जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना (Police) गोळीबार व अश्रुधूर नळकांड्याचा वापर करावा लागला. यामध्ये एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे…

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास मंदिराच्या प्रवेशद्वारावर हल्ला (Attack) करण्यात आला. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांच्या आणि खासगी मिळून अशा एकूण १३ गाड्या जाळल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याचा वापर करत हवेत गोळीबार केला.

तर छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता (Nikhil Gupta) म्हणाले की, संभाजीनगरमध्ये लोक एकोप्याने राहतात, अशीच शांतता ठेवण्यात आणि चांगलं वातावरण ठेवण्यात नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. कालच्या घटनेप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जे लोक यात सहभागी होते त्यांना अटक (Arrested) करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी किराडपुरा भागात मोठा बंदोबस्त तैनात केला असून नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच संभाजीनगरातील सर्वपक्षीय नेत्यांनी देखील नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

- Advertisment -

ताज्या बातम्या