Video : नाशिकच्या शिंदे-ठाकरे समर्थकांमध्ये राडा

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिवसेनेतील ( Shivsena) फुटीमुळे यंदाच्या वर्षी मुंबईत सेनेच्या दोन गटांचे दसरा मेळावे होत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाचा दसरा मेळावा ऐतिहासिक शिवाजी पार्कच्या मैदानावर होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बीकेसीच्या मैदानात दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण केली आहे…

दोन्ही गटांच्या मेळाव्यांसाठी राज्यभरातून लाखो कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत. नाशिकहून निघालेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शहापूर या ठिकाणी राडा झाल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेच्या गाडीतील महिलेकडे पाहून अश्लील हावभाव केल्याने हा प्रकार घडल्याचे समजते.

शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची गाडी थांबवली आणि शिंदे-ठाकरे समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. शिंदे गटाच्या गाडीतून शिवसेनेच्या गाडीतील महिलेकडे बघून अश्लील हावभाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *