Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याबीएमसीच्या शिवसेना कार्यालयात शिंदे-ठाकरे गटाचा राडा

बीएमसीच्या शिवसेना कार्यालयात शिंदे-ठाकरे गटाचा राडा

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

मुंबई महानगरपालिकेमध्ये ( BMC )बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यात जोरदार राडा पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने हक्क सांगितला आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने हक्कसांगितला. राहुल शेवाळे, शितल म्हात्रे, नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेना पक्षकार्यालयाबाहेर यशवंत जाधव यांच्या नावावर लावलेला कागद पटवत पक्ष कार्यालयावर हक्क सांगितला आहे.

शिंदे गटाने मुंबई महापालिकेतल्या शिवसेनेच्या कार्यालयावर हक्क सांगितल्यावर त्या ठिकाणी ठाकरे गटही पोहोचला. मुंबई महापालिकेत हे दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. दोन्ही गटांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महापालिकेमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान शिवसेनेच्या कार्यालयावर दावा केल्यानंतर नंतर शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. अशापद्धतीने कार्यालयावर कब्जा करणं चुकीचं असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या, तर आमच्याकडे संख्या जास्त आहे, त्यामुळे या कार्यालयावर आमचाच दावा असल्याची प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या