बंदला गालबोट : महाविकास आघाडी-भाजपच्या कार्यकर्त्यांत हाणामारी, माजी नगराध्यक्ष जखमी

बंदला गालबोट : महाविकास आघाडी-भाजपच्या कार्यकर्त्यांत हाणामारी, माजी नगराध्यक्ष जखमी

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे राज्यभरात महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील घटनेमुळे बंदला गालबोट लागले.

बंदला गालबोट : महाविकास आघाडी-भाजपच्या कार्यकर्त्यांत हाणामारी, माजी नगराध्यक्ष जखमी
राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात: नाशिक, नगरला यलो अलर्ट

भुसावळ तालुक्यातील वरणगावात या बंदला गालबोट लागलं आहे. वरणगावमध्ये दुकानं बंद ठेवण्याच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीचे आणि भाजपचे कार्यकर्ते वरणगाव बस स्टँडजवळ थेट आमनेसामने आले. यावेळी महाविकास आघाडीचे नेते दुकानं बंद करण्याचं आवाहन करत होते. तर भाजपचे पदाधिकारी दुकानं उघडण्याचं आवाहन करत होते. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. या बाचाबाचीचं रुपांतर थेट हाणामारीत झालं. या हाणामारीत भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे जखमी झाले आहेत. या घटनेमुळे बराच वेळ परिसरात दहशतीचं वातावरण होतं. गावात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

Related Stories

No stories found.