Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याकार्यभार न दिल्याच्या तक्रारीचा मागितला खुलासा

कार्यभार न दिल्याच्या तक्रारीचा मागितला खुलासा

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषद बांधकाम विभाग (Zilha Parishad Construction Department) क्रमांक दोनच्या निलंबीत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गायत्री पवार (Engineering Assistant Gayatri Pawar) यांच्याकडून कार्यभार मिळाला लेखी तक्रार कार्यभार सोपविण्यात आलेले कनिष्ठ अभियंता योगेश ठाकरे (Junior Engineer Yogesh Thackeray) यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे केलेली आहे

- Advertisement -

याची दखल घेत कार्यकारी अभियंता संजय नारखेडे (Executive Engineer Sanjay Narkhede) यांनी ठाकरे यांच्याकडून फाईलींची यादी (List of files) मागवली असून त्यावर, संबंधित पवार यांच्याकडून खुलासा मागवला आहे. ऑगस्ट महिन्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Former Chief Executive Officer Leena Bansod) यांच्याकडे गायत्री पवार यांच्या विरोधात दाखल झालेल्या समितीकडून चौकशी केली. या चौकशीत पवार यांच्या विरोधात झालेल्या तक्रारींवर तथ्य आढळून आल्याने बनसोड यांनी तातडीने पवार यांचे निलंबन (Suspension) करत दणका दिला होता.

याबाबतचे आदेश 18 ऑगस्ट 2022 रोजी काढण्यात आले होते. या कारवाईनंतर त्यांचा कार्यभार कनिष्ठ अभियंता स्थापत्य ठाकरे यांच्याकडे देण्याचे आदेश दिले होते. मात्र, पवार यांनी अजूनही फ़ाईली आपणाकडे सोपविल्या नसल्याची लेखी तक्रार ठाकरे यांनी गत आठवडयात कार्यकारी अभियंता नारखेडे यांच्याकडे केली. लेखी स्वरूपात पवार यांच्याकडून कार्यभार प्राप्त झालेला नाही. तसेच कामकाजासंबंधीत फाईली यादीसह मिळालेल्या नाहीत.

मालेगाव तालुक्यातील (malegaon taluka) काही शिक्षक (teachers) भाडे प्रस्ताव संबंधित माहिती घेण्यासाठी आले असता तीन पैकी एक फाईल आढळून आली. दोन फाईली अद्यापही आढळून आलेल्या याबाबत भविष्यात काही उद्भवल्यास आपणास जबाबदार धरू नये, असे ठाकरे यांनी तक्रार अर्जात म्हटले होते. या अनुषगांने नारखेडे यांनी ठाकरे यांच्याकडून पवार यांनी न दिलेल्या फाईलींची यादी मागवली आहे. तसेच याबाबत पवार यांच्याकडे खुलासा मागवला असल्याचे नारखेडे यांनी सांगितले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांनी देखील तक्रारींची दखल कारवाई करण्याच्या सूचना नारखेडे यांना दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या