Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रशहरी भागांत नवीन आरोग्य केंद्रे

शहरी भागांत नवीन आरोग्य केंद्रे

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात नागरीकरण वाढत असल्याने सार्वजनिक आरोग्य विभाग नगरपंचायती आणि महानगरपालिका क्षेत्रांमध्ये नागरी आरोग्य केंद्र उभारणार असल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत केली. त्याचबरोबर राज्यातील सर्व सरकारी कर्मचार्‍यांचे वय 40 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एकदा आणि 50 ते 60 वयोगटांत दोन वेळा संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यासाठी 250 कोटी रुपयांची योजना आखल्याचे टोपे यांनी सांगितले.

- Advertisement -

राज्यातील नागरीकरण 45 टक्केपेक्षा अधिक झाले आहे. नागरी भागातील लोकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे नगरपंचायतीमध्ये नागरी आरोग्य केंद्र उभारणार आहोत. त्याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रात 15 हजार लोकसंख्येला आरोग्य सुविधेसाठी केंद्र उभारण्यात येईल, असे टोपे यांनी जाहीर केले.

राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांचे वय 40 वर्षे पूर्ण झाल्यानंतर व 50 वर्षांपर्यंत एकदा तर 50 ते 60 या वयोगटात संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी 250 कोटी रुपये खर्च होतील, असेही टोपे म्हणाले.

तालुक्याच्या ठिकाणी रक्तघटकांची तपासणी करणारी यंत्रणा

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रक्तघटकांची तपासणी करणारी यंत्रणा उभारण्यात येणार आहे, तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एमआरआय मशीन बसवण्यात येणार आहे. 100 खाटांच्या रुग्णालयांत सिटीस्कॅन यंत्रणा बसवण्यात येईल, अशी घोषणाही राजेश टोपे यांनी केली. कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहाता प्रत्येक जिल्ह्यात कर्करोग निदान करणारी मोबाईल व्हॅन तैनात करण्यात येणार आहे. त्यासाठी आशा कर्मचार्‍यांनाही प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे टोपे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या