ड्रोनद्वारे झाले शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण; लवकरच मिळणार मनपाला नकाशा

ड्रोनद्वारे झाले शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण; लवकरच मिळणार मनपाला नकाशा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरात (nashik city) मनपाचे अनेक ठिकाणी भूखंड पडून आहेत. मात्र, याची माहिती आणि ताबा पालिकेकडे (municipality) नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या जागांचा वापर खासगी व्यक्ती करत आहे.

काही तशाच पडून आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून अशा जागा पालिकेकडून (municipality) शोधल्या जात आहे. मार्चपासून अक्षय इंजिनिअर्स या संस्थेकडून पालिकेच्या मोकळ्या जागा, भूखंड (plots) आदींची माहिती ड्रोनद्वारे सर्वेक्षण (Survey by drone) करण्यात आल्. नुकतेच हे सर्वेक्षण (Survey) पूर्ण झाले असून आता नकाशाद्वारे (map) अंतिम माहिती संकलीत केली जाणार आहे.

दरम्यान पालिकेकडे किती भूखंड, मिळ्कती आहेत, याची माहितीच पालिकेकडे नाही. त्यामुळे कागदोपत्री जागा आहे. प्रत्यक्षात मात्र ती पालिकेच्या ताब्यात नसल्याचे वास्तव आहे. यामुळे अनगिणत मालमत्ता (property) असून, आजमितीला त्यावद्दल माहितीच नसल्याने उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. मालमत्ता शोधकामानंतर महापालिकेकडे स्वतः च्या मालमत्तांची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल.

त्यामुळे नव्याने समोर आलेल्या मालमत्ता भाडेतत्त्वावर (Property lease) देऊन त्यापसून उत्पन्न मिळू शकते. महापालिकेने गेल्या वर्षी मालमत्ता शोधकामासाठी अक्षय इंजिनिअरिंग कंपनीला काम दिले आहे. त्यासाठी नगररचना (town planning), मिळकत, भूसंपादन (Land acquisition), अतिक्रमण (Encroachment) विभागांनी त्यांच्याकडील माहिती व नकाशे सबंधित कंपनीला दिले आहेत. या माहितीच्या आधारे कंपनीने शहरात काम सुरू केले आहे. पहिल्या टप्प्याअंतर्गत 269 स्केअर किलोमीटर हद्दीचे ड्रोन सर्वेक्षणाचे (Drone survey) काम पूर्ण झाले आहे.

ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. तर जियो रेफ्रन्सींगचे (Geo referencing) काम अंतिम टप्यात असून या महिन्यात अहवाल मिळू शकतो. यानंतर महापालिकेचे किती रस्ते किती आहे. मिळ्कती किती आहे. असा सर्व शोध लागेल. लेखी असलेली माहिती नकाशावर येइल तसेच प्रत्येक विभागात मिळ्कत कुठे आहे. याची माहिती मिळेल.

- हर्षल बावीस्कर, उपसंचालक नगररचना विभाग, मनपा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com