आजपासून शहर बस धावणार

दर तासाला फेर्‍या
आजपासून शहर बस धावणार

नाशिक । प्रतिनिधी

लॉकडाऊनमुळे तब्बल आठ महिन्यांपासून नाशिकची शहर बस सेवा ठप्प होती. मात्र आता मिशन बिनिग अगेन अंतर्गत गुुरुवार(दि.22) पासून शहर बसेस विविध सहा मार्गांवर धावणार आहे.

या मार्गावर सकाळी सहा वाजेपासून दर एका तासाला शहर बसेस धावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र शहरी बसेसमध्ये प्रवास करतांना शासनाच्या नियमानुसार मास्क व सॅनिटायझरचा नियम बंधनकारक असणार आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये शहरी बस सुविधा महत्वाचा घटक आहे.

या बससुविधेच्या माध्यमातून रोज विद्यार्थी, कामगार वर्ग, नागरिक शहरात प्रवास करत होते. एसटी महामंडळाच्या स्थानिक अधिकार्‍यांकडून शहर बसबाबत कोणत्याही निर्णय घेण्यात आलेला नव्हता. परिणामी नागरिक तसेच कामगार वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

प्रवाशांची मागणी लक्षात घेता एसटीच्या वतीने गुरुवारपासून शहरातील सहा मार्गावरील शहरी बसेस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सुरुवातीला 10 ते 15 बसेस धावणार असून प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता टप्पाटप्पाने बसेसची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी दिली.

या मार्गावर धावणार बसेस

निमाणी ते नाशिकरोड

निमाणी ते श्रमिकनगर

निमाणी ते उत्तमनगर

निमाणी ते अंबड

निमाणी ते विजयनगर

निमाणी ते पाथर्डी गाव

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com