Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यावाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त; सिग्नल यंत्रणा व पार्किंगची मुबलक सोय करण्याची मागणी

वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त; सिग्नल यंत्रणा व पार्किंगची मुबलक सोय करण्याची मागणी

नाशिक | प्रतिनीधी | Nashik

शहरातील अत्यंत वर्दळीच्या अशा गंगापूर रोडवर (gangapur road) सतत वाहतूक कोंडी (traffic jam) होत असल्यामुळे नागरिकांना विशेषता वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे शहीद सर्कल ते अशोक स्तंभ या सुमारे तीन किलोमीटरच्या अंतरावर फक्त गंगापूर नाका या ठिकाणी एकच सिग्नल यंत्रणा (signal system) सुरू आहे. दुसरीकडे अनेक अनेक भल्या मोठ्या इमारती व्यवसायिक प्रतिष्ठान असल्या तरी पाहिजे त्या प्रमाणात पार्किंग व्यवस्था (parking system) नसल्यामुळे संपूर्ण मार्गावर दोन्ही बाजूला अनेक ठिकाणी वाहने थेट रस्त्यावर पार्क करण्यात येत असल्यामुळे या वाहतूक कोंडीत (traffic jam) भर पडत आहे.

नाशिक शहरात वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास होणे हे काही नवीन नाही. मात्र गंगापूर रोड सारख्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून सतत वाहतूक कोंडी होत असल्यामुळे त्याचा परिणाम शहरातील इतर चौकांवर होत आहे. दरम्यान अशोक स्तंभ हा शहरातील महत्त्वाच्या चौकांपैकी एक आहे.

नाशिक शहर तसेच पंचवटी (panchavati), गंगापूर रोड (ganagapur road), रविवार कारंजा आदी भागांना जोडणाऱ्या या चौकात सतत वर्दळ असते. मात्र सकाळी शाळा (school), महाविद्यालय (college) तसेच विविध ऑफिसेस सुरू होण्याच्या वेळी व सायंकाळी त्यांच्या सुट्टीच्या वेळी या चौकात वाहतूक कोंडी होत आहे. अशोक स्तंभ पासून शहीद सर्कल पर्यंत काही ठिकाणी सिग्नल यंत्रणा लावण्याची गरज आहे.

सध्या फक्त गंगापूर नाका या ठिकाणी सिग्नल यंत्रणा सुरू आहे. त्यामुळे तिथून सुटलेली वाहने थेट अशोक स्तंभापर्यंत येते. याठिकाणी चार महत्त्वाचे भाग एकत्रित येत असल्यामुळे संपूर्ण भार या ठिकाणी पडतो व वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी वाहतूक पोलीस उभे असले तरी सायंकाळच्या सुमारास वाहतूक कोंडी सोडविण्यास त्यांनाही अपयश येतो.

ही आहे कारणे

  • गंगापूर रस्त्यावर प्रशासनाच्या वतीने प्रशस्त पार्किंगची सोय नाही.

  • त्यामुळे दुकानांच्या समोर लहान-मोठ्या गाड्या उभ्या करण्यात येतात.

  • प्रसाद सर्कल, जनावरांचा दवाखाना, खतीब डेअरी, कॉलेज रोड कॉर्नरसह काही चार मार्ग एकत्र येण्याच्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा नसल्यामुळे वाहने सरळ पुढे निघून जातात.

  • अशोक स्तंभावर पंचवटीतून येणारा वाहनांचा भार व नाशिकहून पंचवटीकडे जाणाऱ्या वाहनांचा भार एकच वेळी येते.

  • स्मार्ट सिटीची तीन ठिकाणी पार्किंग असली तरी मागील तीन वर्षापासून ठेकेदाराने काही कारणास्तव ती बंद ठेवली आहे परिणामी रस्त्यावर वाहने उभे राहतात.

स्मार्ट सिटीची पार्किंग बंद स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात 15 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी गंगापूर रस्त्यावर तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था होती. त्याला चालवण्याचा ठेका देण्यात आलेला आहे. मात्र करोना काळात ठेकेदाराने ठेका बंद केल्याने सध्या गंगापूर रोडवरील तिन्ही पार्किंगची ठिकाणी बंद आहे. लवकरच याबाबत चर्चा करून पार्किंग सुरू करण्यात येईल.

– सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या