मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचा नागरिकांनी लाभ घ्यावा: जिल्हाधिकारी गंगाथरन डी.

मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचा नागरिकांनी लाभ घ्यावा: जिल्हाधिकारी गंगाथरन डी.

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

सामान्य नागरिकांचे मुख्यमंत्री (Chief Minister) यांना उद्देशून असलेले दैनंदिन अर्ज, निवेदने (memorandum) तसेच शासनस्तरावरील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी

शासन निर्देशानुसार जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (Chief Minister's Secretariat Office) सुरू करण्यात आला आहे. या कक्षाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Collector Gangatharan D.) यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे (Resident Deputy Collector Bhagwat Doifode) यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सचिवालय कक्षात ग्रामीण भागातील व सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्न, अर्ज, संदर्भ इत्यादी स्वीकारण्यात येत आहेत.

अशा अर्जांच्या बाबतीत जिल्हा स्तरावरून कार्यवाही होणे अपेक्षित असल्याने अशी प्रकरणे संबंधित जिल्हा स्तरावरील विभाग प्रमुखांकडे वर्ग करून त्यावर तातडीने कार्यवाही करणेबाबत सूचित करण्यात येत आहे. त्या बाबतीत कालबद्ध निपटरा होण्यासाठी कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच जे अर्ज, निवेदने व संदर्भ राज्य शासनाच्या स्तरावरील असतील ते अर्ज व याबाबतचा दरमहा अहवाल मुख्यमंत्री सचिवालय मुंबई यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे,असेही जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com