Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याजखम मांडीला अन् मलम शेंडीला

जखम मांडीला अन् मलम शेंडीला

नाशिक । प्रतिनिधी Nashik

येथील अशोकस्तंभ ते रविवार कारंजापर्यतचा ( Ashok Stambh to Ravivar Karanja Road )रविवार पेठ हा रस्ता पुण्याच्या लक्ष्मीरोडच्या धर्तीवर विकसित केला असता तर येथील वाहतूक अन् पार्किंगचा प्रश्न निकाली निघाला असता. मात्र त्याला विरोध झाला.हा रस्ता दिवसेेंदिवस आखडतच चालला. आता येथील रहिवाशांना व व्यावसायिकांना स्व:ताचीच वाहने उभी करायलाही जागा अपुरी पडू लागली अशी स्थिती आहे. मात्र, मुळ प्रश्नाला बगल देत कायम ‘जखम मांडीला अन् मलम शेंंडीला’लावलेले आजपर्यंत दिसले आहे. नवनवीन प्रयोग येथील नागरिक अनुभवत आहेत.

- Advertisement -

अशोकस्तंभापासून रविवार कारंजापयर्ंंतचा रस्ता कायम वर्दळीचा राहिला आहे. पूर्वी ही घाऊक बाजारपेठ असल्याने माल उतरविण्यासाठी ट्रक येत असत. त्या समस्येवर उपाय म्हणून 10- 15 वर्षापूर्वी येथील घाऊक व्यापार्‍यांना बाजार समितीत गाळे दिले.त्यानंतर ही समस्या थोडी कमी झाली. मात्र, त्यानंतर शहरात वाहनधारकांची संख्या वाढत गेली. दुचाकीचालक चार चाकीतून येऊ लागले.

प्रत्येकाला आपल्या घरासमोर, दुकानासमोर वाहने उभी करण्यास पुरेशी जागा राहिली नाही.त्यात ग्राहक म्हणून आलेल्यांंना तर आपले वाहन दुसरीकडे पाार्क करुन यावे लागते.म्हणूनच येथे यशवंत मंंडई पाडून बहुमजली पार्किंगचा प्रस्ताव माजी नगरसेवक विजय साने यांनी दिला होता. मात्र, तोही बरेच वर्ष बासनात गुंडाळून ंठेवला आहे. त्यानंंतर रविवार कारंजा येेथे ट्रायल रनचा प्रयोग झाला.त्यामुळे वाहतुकीचा पुरता फज्जा उडालेला दिसला.नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागले. यातच व्यापारी महासंघाने तीव्र निषेध नोंंदविला.

शहरातील जुनी मुख्य बाजारपेठ असलेल्या या रविवार कारंजाची मुख्य समस्या ही पार्किंगचीच आहे. मात्र, त्यावर रामबाण उपाय शोधणारा कोणीही अभियंता पुढे आला नाही. येथे असलेल्या यशवंत मंडई येथे प्रस्तावित वाहनतळ आहे; त्याचे काम प्राधान्याने करायचे सोडून नवनवीन प्रकल्प हाती घेतले जात आहेत.

या रविवार कारंजावर गरज पार्किंगची आहे. त्यामुळे यशवंत मंडईत बहुमजली पार्किंगची सोय प्राधान्याने करावी. यानंतर येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी निघेल.असे आजही येथील व्यावसायिकांना वाटते. मात्र, मूळ प्रश्नाला बगल देत कायम जखम मांडीला अन् मलम शेंंडीला लावलेले आज पर्यंत दिसले आहेत.

या भागातील माजी नगरसेवक दिवंगत रमेश शिंदे यांनी हा रस्ता लक्ष्मीरोडसारखा व्हावा यासाठी प्रयत्न केले होते. त्यावेळी त्यांना एवढा विरोध झाला की शेवटी पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून या समस्येला हात घालण्याची एकाही नगरसेवकाची इच्छा झाली नाही. यामुळे या समस्येची जखम वाढतच चालली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या