Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यामनपाच्या 'वीज निर्मिती'ला नागरीकांच्या सहकार्याची गरज

मनपाच्या ‘वीज निर्मिती’ला नागरीकांच्या सहकार्याची गरज

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

मनपाच्या शहराच्या विकासासाठी (development) विविध योजना राबवित असताना नागरिकांच्या बेफिकिरी मुळे त्याला हरताळ फासला जात असल्याचे चित्र अनेक वेळा दिसून येत आहे.

- Advertisement -

महानगरपालिकेने (Municipal Corporation) कोट्यावधी रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू केलेल्या वीज निर्मिती प्रकल्पाला (Power generation project) नागरीकांच्या उपेक्षेमुळे असाच फटका बसत असल्याचे चित्र आहे. मनपाद्वारे शहरात जमा होणार्‍या टाकाऊ ओल्या कचर्‍यापासून विज निर्मितीचे लक्ष हाती घेण्यात आले होते.

यासाठी पांडवलेण्याजवळील खत प्रकल्पावर (Fertilizer project) नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) माध्यमातून जीआयझेड (GIZ) या जर्मन सरकारच्या संस्थेच्या माध्यमातून 6 कोटी 80 रुपयांचं अनुदान (subsidy) घेण्यात आलं होतं त्या माध्यमातून खत प्रकल्पावर ओल्या कचर्‍यापासून वीज निर्मिती (Generation of electricity from waste) करणारी यंत्रणा उभारण्यात आली होती. मात्र या प्रकल्पाच्या क्षमतेपेक्षा अत्यल्प कचरा (garbage) जमा होत असल्याने हा प्रकल्प अतिशय संथ गतीने सुरू आहे.

प्रकल्पाची प्रत्यक्ष प्रक्रिया

शहरातून जमा होणार्‍या ओल्या कचर्‍याच्या प्रमाणात शौचालयाचा मलबा एकत्रित केला जातो व त्या माध्यमातून गॅस निर्मिती (Gas generation) केली जाते. त्यातून मिथेन वायूची निर्मिती (Production of methane gas) केली जाते. या मिथेन वायूला आणखी शुद्ध करण्यासाठी स्क्रबर यंत्रणाही (Scrubber system) उभारण्यात आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून तयार झालेल्या 70 टक्क्यांपर्यत प्रमाणात असलेले मिथेन वायुला (methane gas) 90 टक्क्यांपर्यत शुद्ध केले जाते. या मिथेनच्या माध्यमातून या ठिकाणी उभारण्यात आलेल्या वीज जनरेशन बँक (Power Generation Bank) च्या माध्यमातून एकत्र करुन ही वीज शहराच्या वीज वितरण कंपनीकडे (Electricity Distribution Company) वर्ग केली जाते. विज वितरण कंपनीला दिलेल्या वीजेच्या बदल्यात मनपाच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रांवर (water treatment plant) लागणारा वीज पुरवठा (Power supply) घेतला जातो.

या प्रकल्पाची प्रत्यक्ष क्षमता 3300 युनिट प्रतिदिन निर्मितीची आहे. प्रत्यक्षात या यंत्रणेच्या माध्यमातून 200 किलो वॅट निर्मिती केली जात आहे शहरातून जर दीड ते दोन टन ओला अन्न कचरा व दीड ते दोन टन सॉप्टेज अर्थात सेफ्टी टँकचा मलबा एकत्र केल्यास या माध्यमातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती होऊ शकते.

मनपा आयुक्तांनी मध्यंतरी हॉटेल चालकांची बैठक बोलावून हॉटेलमध्ये निघणारा ओला कचरा स्वतंत्र देण्याची विनंती केली होती. या माध्यमातून हा प्रकल्प आणखी कार्यक्षमपणे चालवणे शक्य होणार असल्याचे हॉटेल चालकांचे निदर्शनास आणून दिले.

नागरी वसाहतींमधील कचरा विभक्त करण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसात ढेपाळचे दिसून येत आहे.याबाबत आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेण्याची गरज अधोरखित होत आहे. नाशिक शहरातील हॉटेल चालक विवाह सोहळ्यातील लॉन चालक यांच्या माध्यमातून दररोज 20 ते 25 टन ओला कचरा जमा होऊ शकतो. त्या माध्यमातून तयार होणार्‍या वीजेमुळे मोठ्या प्रमाणात मनपा विजेच्या बाबत स्वयंपूर्ण होऊ शकते.

मनपाच्या खर्चाचा भार कमी करणे म्हणजेच नागरीकांवर वाढणार्‍या कराचा बोझा पर्यायाने कमी होण्यास मदतच होणार आहे. मात्र याबाबत हॉटेल चालक व लॉन चालक जागरूकता पाळण्याची गरज आहे. या प्रक्रियेसाठी केवळ अन्नपदार्थांचा ओला कचराच आवश्यक असल्याने नागरिकांनी देखिल ओला व सूका कचरा विलगपणे देउन या उपक्रमाला सहकार्य करावे.

– बाजीराव माळी कार्यकारी अभियंता मनपा यांत्रिकी विभाग

- Advertisment -

ताज्या बातम्या