Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानव्या तीन मार्गांवर सिटीलिंक बससेवा सुरु होणार

नव्या तीन मार्गांवर सिटीलिंक बससेवा सुरु होणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका बससेवा ( NMC Bus Services )सध्या सुसाट सुटली आहे. प्रवासी संख्या वाढत असल्यामुळे सिटीलिंकच्या ( CITILINK )वतीने 3 नवीन मार्ग सुरू करण्यात येत आहेत तर 3 मार्गांवरील बस फेर्‍यांमध्ये वाढ होणार आहे. अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने प्रवासी संख्येचा विचार करता काही नवीन मार्ग सुरू करण्याबरोबरच काही मार्गांवरील बस फेर्‍यांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. यामध्ये नवीन सीबीएस ते कोणार्क नगर (संकलेचा सोसायटी) मार्गे निमाणी, अमृतधाम. – हा नवीन मार्ग सुरू करण्यात आला. या मार्गावर सकाळी 6.10 वाजेपासून 20.45 पर्यंत एकूण 20 बस फेर्‍या होणार आहे.

तर नवीन सीबीएस ते पार्क साईट मार्गे अमृतधाम, बीडी कामगार नगर – हा देखील नवीन मार्ग सुरू करण्यात आला असून या मार्गावर सकाळी 6.10 वाजेपासून 19.50 पर्यन्त एकूण 18 फेर्‍या होणार आहे. नवीन सीबीएस ते मोहाडी मार्गे म्हसरूळ, वरवंडी, शिवनई, आंबे – या नवीन मार्गावर 2 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून सकाळी 5.30 ते 18.35 वाजेपर्यन्त एकूण 16 फेर्‍या होणार आहे.

निमाणी ते चुंचाळे गाव मार्गे त्रिमूर्ति चौक, कामटवाडे – सदर मार्गावर नवीन 4 बस संख्या वाढविण्यात आली असून यामुळे या मार्गावर पूर्वीच्या 4 व नवीन 4 अशा एकूण 8 बसेस धावणार आहे. यामुळे दर 15 मिनिटांना बस फेर्या येथे उपलब्ध होणार आहे.

नाशिक रोड ते बारदान फाटा मार्गे द्वारका, सिव्हिल, सातपुर, अशोक नगर – या मार्गावरील बस फेर्यांमध्ये वाढ करण्यात आली असून आता पूर्वीच्या अर्धा तासाऐवजी दर 15 मिनिटांना बस फेर्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नाशिक रोड ते सिम्बोईसीस कॉलेज मार्गे सी.बी.एस, पवन नगर, उत्तमनगर – या मार्गावरील बस फेर्यांमध्ये देखील वाढ करण्यात आली असून या मार्गावर पूर्वीच्या अर्धा तासा ऐवजी आता दर 15 मिनिटांना बस फेर्‍या होणार आहे.

प्रवाश्यांची वाढती संख्या व मागणी लक्षात घेता हे नवीन मार्ग सुरू करण्याबरोबरच काही मार्गावरील बस फेर्‍यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या