पावसामुळे सिटीलिंक बसेसवर विपरीत परिणाम

पावसामुळे सिटीलिंक बसेसवर विपरीत परिणाम

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

संततधार पावसामुळे (Rain) नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) सिटीलिंक बसेसवरही (Citilinc Bus) परिणाम झाल्याचे चित्र आहे. दररोज दुपारी दोनपर्यंत बारा लाखाचे उत्त्पन्न कमाविणाऱ्या सिटीलिंकला आज दुपारी तीनपर्यंत केवळ दहा लाखांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे कंपनीने आज फेर्‍या रद्द करुन खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला...

आज पावसामुळे अनेक जण बाहेर आले नाही. त्यामुळे वाहतुक कमी झाली. 60 ते 65 टक्केच वाहतुक होऊ शकली. त्यातच बर्‍याच ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीवर परीणाम होऊन संथ गतीने वाहतुक सुरु होती.

परिणामी बसेसही उशिरा येऊ लागल्या. दोन-दोन तास उशीर झाल्याने काही मार्गावरील फेर्‍या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शहर बसेस काही मार्गावर आज धावू शकल्या नाहीत, असे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद बंड यांनी सांगितले. मात्र फेर्‍या अचानक रद्द झाल्याने बसच्या भरवशावर थांबलेल्या प्रवाशांची अडचण झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com