मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

मंडल अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नाशिक / दिंडोरी | प्रतिनिधी Nashik / Dindori

न्यायालयाचे आदेश असतांनाही शेतजमिनीचे सात बाराच्या उताऱ्यावर (7/12 Extract ) तक्रारदाराच्या मावशीचे नाव समाविष्ट करण्याकरिता दहा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या मंडल अधिकाऱ्याला (Circle Officer)लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ( ACB) सापळा रचत अटक केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि,तक्रारदाराला त्यांच्या मावशीचे नाव सात बाराच्या उताऱ्यावर समाविष्ट करायचे होते. त्याकरिता न्यायालयाने देखील आदेश दिले होते मात्र दिंडोरी येथील तहसिल कार्यालयातील ( Dindori Tehsil office)मंडल अधिकारी कमरुद्दिन गुलाम अहमद सैयद ( 43) यांनी तक्रारदाराकडे दहा हजारांची लाच मागितली.

यावरून तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली असता पोलीस अधीक्षक सुनील कडासने,अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे,वाचक उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी उपअधीक्षक अभिषेक पाटील,अंमलदार सुकदेव मुरकुटे,मनोज पाटील यांच्या पथकाने कमरुद्दीन सैयद याला दहा हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com