दरोडेखोरांचा सिनेस्टाईल पाठलाग, कारसह सराफाची बॅग, पिस्टल जप्त

निजामपूर पोलिसांची सतर्कता, समयसुतकेचे कौतूक
दरोडेखोरांचा सिनेस्टाईल पाठलाग, कारसह सराफाची बॅग, पिस्टल जप्त

निजामपूर । Nizampur । वार्ताहर

नंदुरबार (Nandurbar) येथील सराफाला (Sarafa) लुटून प्रसार झालेल्या दरोडेखोरांचा (robbers) निजामपूर पोलिसांनी (Nizampur Police) अगदी सिनेस्टाईल पाठलाग (Cinestyle chase) केला. रस्त्यावर वाहने आडवी लावून अडथळाही निर्माण केला. सततच्या पाठलागामुळे दरोडेखोर (robber) जंगलात (forest) वाहनासह मुद्येमाल (Goods including vehicle) सोडून पसार (let go) झाले. पोलिसांनी सराफाची चोरलेली बॅग, वाहन, पिस्तूल जप्त केले. दरम्यान सायंकाळच्या सातवाजेचा हा थरार अनेकांनी प्रत्यक्ष अनुभवला.

नंदुरबार येथील सराफ व्यवसायिक रुपेश सुमनलाल सोनार हे काल दि.16 रोजी आपले दुकान बंद करून उमरदे (ता.नंदूरबार) येथे जात होते. त्यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पावडर टाकून त्यांच्याजवळ असलेली सोने-चांदीच्या दागिन्याची बॅग हिसकावून कारने पसार झाले. दरम्यान हे चोरटे निजामपूरकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छडवेल जवळ निजामपूर पोलिसांनी चोरट्यांच्या वाहनाला अडवण्याचा प्रयत्न केला.

मात्र चोरट्यांनी जैताणेकडे पळ काढला तेथून पोलिसांनी तब्बल 12 किलोमीटर अंतरावर चोरट्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. चोरांना पकडता यावे, यासाठी पोलिसांनी खुडाणे चौफुली जवळ रस्त्यावरच ट्रक, रिक्षा रस्त्यात आडवे उभे केले. पुढे जाण्यास अडचण असल्याचे बघून चोरांनी पुन्हा नंदुरबार रस्त्याकडे आपले वाहन वळविले. वाजदरे गावाच्या जवळ पूर्वेच्या दिशेने आखाडे गावाकडे त्यांनी गाडी नेली. मात्र पोलिसांचा पाठलाग सुरूच होता. चोरट्यांनी नदीकडे गाडी नेली त्याच ठिकाणी आपले वाहन सोडून चोरट्यांनी लगतच्या जंगलात अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

पोलिसांनी चोरट्यांचे वाहन ताब्यात घेतले. या वाहनात एक पिस्तुंलसह सोने-चांदीचे दागिने असलेली बॅग आढळून आली. एकुण 9 लाख 76 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल तसेच कार, एक गावठी पिस्तूल, दोन चाकू असा मुद्देमाल कारमध्ये मिळाला. तो नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या ताब्यात दिला.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपअधिक्षक प्रदीप मैराळे, गुन्हे शाखेचे निरिक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे, पोलीस कॉन्स्टेबल गरदारे, नरेंद्र माळी, चालक चौधरी, राजा अहिरे, माळचे यांनी केली.

वाहनाला दोन नंबरप्लेट

चोरट्यांनी वापरलेल्या वाहनाला एमएच 43 व्ही 3091, व त्याखाली एमएच 06 जेके 0678 अशा दोन नंबर प्लेट आढळून आल्या. त्यामुळे हे वाहन चोरीचे असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com