Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासिडकोची नवीन योजना लवकरच सुरू होणार ?

सिडकोची नवीन योजना लवकरच सुरू होणार ?

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

सिडकोने नाशिक शहरात सहा योजना उभारल्या असून आता यापुढे घरकुल योजनेला लागुन असलेल्या पांजारपोळच्या जागेवर सिडकोकडून अजून नवनवीन योजना उभारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .

- Advertisement -

जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाबरोबर बैठक घेऊन नवीन योजनांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सिडकोचे प्रशासक घनश्याम ठाकूर यांनी दिली.

भुजबळ फार्म येथे झालेल्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खा. समीर भुजबळ उपस्थित होते. सिडको प्रकल्पाचा अनुषंगाने झालेल्या बैठकीत पांजरपोळ ट्रस्टची बाराशे एकर जमीन सिडकोला नवीन प्रकल्पाकरीता हस्तांतरित करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव नगरविकास कडे सादर करणे,

सिडकोचा मेट्रो प्रकल्प आणि पर्यटन प्रकल्पातील अनुभवाचा विचार करता नाशिक मेट्रो तसेच नाशिक जिल्ह्यातील शासना द्वारा विकसित करण्यात येणार असलेली पर्यटन स्थळे हे प्रकल्प देखील सिडकोकडे वर्ग करावे याबाबत शासनाशी बोलणार असून या विषयांबाबत लवकरच उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सिडको यांच्यासमवेत बैठक घेणार असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.

गेल्या कित्येक वर्षांपासून सिडको च्या नवीन योजनेबाबत अद्याप चर्चा सुरू होती आता हा प्रकल्प नाशकात नव्याने सुरू झाल्यास नाशिककरांच्या सिडको कडून अपेक्षा वाढतील यात शंकाच नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या