Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यासिडकोची सर्वसामान्यांना दिवाळी भेट

सिडकोची सर्वसामान्यांना दिवाळी भेट

मुंबई । प्रतिनिधी

लक्ष्मीपूजनाचा ( Lakshmipujan ) मुहूर्त साधत सिडकोने (शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ, CIDCO) सोमवारी सर्वसामान्यांना दिवाळीची भेट दिली आहे. सिडकोने ७ हजार ८४९ परवडणाऱ्या घरांच्या लॉटरीची आज घोषणा केली. ही घरे नवी मुंबई विमानतळाच्या परिसराजवळ आहेत. उद्या, मंगळवारपासून या घरांच्या लॉटरीसाठी नोंदणी करता येणार आहे. सिडकोच्या या लॉटरीच्या माध्यमातून सामान्यांना नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.

- Advertisement -

सिडकोने लॉटरी जाहीर केलेली घरे ही नवी मुंबईतील उलवे नोडमधील खारकोपर पूर्व आणि बामणडोंगरी येथील आहेत. ही घरे नवी मु्ंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नेरूळ-उरण रेल्वे मार्गाजवळ आहे. नव्याने उभारण्यात येत असलेली गृहसंकुलामध्ये उच्च दर्जाच्या सोयी-सुविधा असणार आहेत. गृहसंकुलांच्या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आदी सुविधा देखील उपलब्ध असतील.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उत्पन्न मर्यादा ही तीन लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याशिवाय, दोन लाख ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सदनिका उपलब्ध असणार आहेत.

नवी मुंबई आणि पनवेल परिसरात सिडको एक लाख घरे उपलब्ध करणार असून आतापर्यंत जवळपास २५ हजार घरे सिडकोने विकली आहेत. गणेशोत्सवातही सिडकोने ४ हजार १५८ घरांची आणि २४५ व्यापारी गाळ्यांसाठीची सोडत जाहीर केली होती. द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहसंकुलातील ४ हजार १५८ घरांची सोडत काढण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या