
भुसावळ bhusaval । प्रतिनिधी
येथील तापी नदिवर असलेल्या श्री तारकेश्वर हनुमान मंदिराजवळ यावल तालुक्यातील अकलुद येथील रहिवासी शुभम सपकाळे या तरूणावर (youth) दि. 21 रोजी सायंकाळी 6.40 वाजेच्या सुमारास त्याच्याच मित्राने भर चौकात चॉपरने (Chopper attack) सपासप वार करून गंभीर जखमी केले व या हल्लेखोराने राजरोसपने तेथुन पोबारा केला आहे.
जखमी शुभम सपकाळे याच्यावर भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे डॉ.मयुर चौधरी यांनी उपचार केले. पुढील उपचारासाठी त्याला सामान्य रूग्णालय जळगाव येथे पाठविण्यात आले. मात्र जखमी शुभमची प्रकृती नाजुक असल्याने त्याच्या कुटूंबियांनी भुसावळ येथील रिदम मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे.
त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. सदर तरूणावर चॉपरने पोटावर, छातीवर, पाठीवर व हातावर असे चार सहा वार झालेले आहेत.
घटनेचे वृत्त समजताच भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व शहर पोलिसांनी माहिती घेवून वेळीच आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे. घटना घडली ती हद्द फैजपूर पोलिसांची असल्याने अधिक तपास फैजपूर ग्रामीणचे पोलिस अधिकारी व कर्मचारी करित आहे.