चीन राष्ट्राध्यक्षांच्या आदेशावरूनच भारताच्या हद्दीत घुसखोरी
मुख्य बातम्या

चीन राष्ट्राध्यक्षांच्या आदेशावरूनच भारताच्या हद्दीत घुसखोरी

युद्धसराव नियोजनाचा भाग

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

बिजिंग - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आदेशावरूनच चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत प्रवेश केला होता अशी माहिती समोर आली आहे. सरकारी वृत्तसंस्थांनीही खुद्द राष्ट्राध्यक्षांनी वर्षाच्या सुरुवातीला सैन्य प्रशिक्षणासाठी सैनिक तैनात करण्याचे आदेश दिले असल्याचे म्हटले आहे.

भारताच्या हद्दीतील गलवान खोरे, पँगोंग सरोवर आणि लडाखमधील इतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून चीनच्या सैन्याने केलेली घुसखोरी ही काही महिन्यांच्या तयारीनंतर केली आहे. चीनने एकाच वेळी अनेक ठिकाणी सैन्याची संख्या वाढवल्याची कृती सुद्धा एका नियोजनाचाच भाग होती. यामुळेच भारत-चीनच्या सैन्यांमध्ये संघर्ष झाला आणि त्यात 20 भारतीय जवान शहीद झाले. हा सर्व घटनाक्रम शी जिनपिंग यांनी आदेश दिल्यानंतरच घडल्याचे सरकारी वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com