Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याभूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी चीन हादरला

भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी चीन हादरला

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

आज सकाळी चीन आणि ताजिकिस्तानच्या (China and Tajikistan) सीमेवर ७.३ तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहे. त्यामुळे भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी चीन हादरला आहे. चीनमध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता तुर्कस्तानमध्ये आलेल्या भूकंपाच्या तुलनेत अधिक होती…

- Advertisement -

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणीचा तिसरा दिवस; आजही ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद

तुर्कस्तानात आलेल्या भूकंपाची (Earthquake) तीव्रता ६.९ एवढी होती. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आलेल्या भूकंपात ४० हजार पेक्षा जास्त लोंकाना आपला जीव गमवावा लागला. मात्र, चीनमध्ये झालेल्या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त अद्याप आलेले नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ‘त्या’ विधानावर स्पष्टीकरण; म्हणाले, अनावधानाने…

तसेच ताजिकिस्तानमध्ये ज्या भागात भूकंप झाला तो भाग पर्वताच्या शिखरांनी वेढलेला आहे. अशा परिस्थितीत तेथे भूस्खलनही होऊ शकते, तसेच या भागात लोकसंख्या (Population) खूपच कमी आहे. तसेच भूकंपाची कमाल तीव्रता अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.

शेततळ्यात बुडून तरूणाचा मृत्यू

दरम्यान, रिश्टर स्केलवर ७.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप मध्यम धोकादायक मानला जातो.तर या स्केलवर २ किंवा त्यापेक्षा कमी तीव्रतेच्या भूकंपाला सूक्ष्म भूकंप म्हणतात, जो बहुतेक जाणवत नाही. ४.५ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे घरांचे नुकसान (Damage) होऊ शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या